LIVE NOW

IPLAuction2019 : युवराज झाला 'मुंबईकर', अखेरच्या क्षणी घेतलं विकत

आयपीएलचा लिलाव अखेर संपला आहे. जयदेव उनाडकट, वरुण चक्रवर्ती हे सर्वात महाग खेळाडू ठरले.

Lokmat.news18.com | December 18, 2018, 10:09 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 18, 2018
auto-refresh

Highlights

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : जगातील सर्वात मोठी टी-20 लीग अर्थातच इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 हंगामासाठी जयपूरमध्ये लिलाव पार पडला. आतापर्यंतच्या या लिलावमध्ये जयदेव उनाडकट हा सर्वात महाग खेळाडू ठरला. जयदेववर 8.5 कोटींची बोली लागली. त्याच्यापाठोपाठ तामिळनाडूचा खेळाडू वरुण चक्रवर्ती हा दुसऱ्या स्थानावर राहिला. वरुणने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वरूण चक्रवर्ती या मिस्ट्री स्पिनरवर चक्क 8.4 कोटींची बोली लागली. किंग्ज इलेव्हन पंजाबने वरूणला खरेदी केलं. तर तिसऱ्या स्थानावर सॅम करन राहिला. सॅमला पंजाबच्या संघाने 7.20 कोटींमध्ये खरेदी केलं. चौथ्या स्थानावर  कॉलिन इंग्रमला दिल्ली कॅपिटलने 6.40 कोटीमध्ये खरेदी केलं.तर शिवम दुबे ला 5.0 कोटीमध्ये आरसीबीने विकत घेतलं. युवराज सिंगला दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई इंडियन्सने 1 कोटीमध्ये विकत घेतलं.

तर दुसरीकडे परदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहण्यास मिळाला. किंग्स इलेव्हन पंजाबने वेस्टइंडीजचा खेळाडू निकोलस पूरनला 4 कोटी 20 लाखांमध्ये खरेदी केलं. निकोलससाठी आरसीबी आणि पंजाबमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. तर जॉनी बेयरस्‍टोला 2 कोटी 20 लाख रुपयांमध्ये हैदराबादने टीमने खरेदी केलं.एकीकडे परदेशी खेळाडूंवर बोली सुरू होती तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंही भाव खाऊन गेले. दिल्‍ली कॅपिटलने अक्षर पटेलला तब्बल ५ कोटींमध्ये खरेदी केलं. या लिलावामध्ये 346 खेळाडू सहभागी झाले होते. सर्वाधिक खेळाडू हे पंजाबच्या संघाने विकत घेतले. पंजाबने एकूण 13 खेळाडू विकत घेतले. त्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटलने 10 खेळाडू विकत घेतले. तर राजस्थान राॅयल आणि आरसीबीने प्रत्येकी 9-9 खेळाडू विकत घेतले. सर्वात कमी खेळाडू हे चेन्नईने विकत घेतले. चेन्नईने फक्त दोनच खेळाडू विकत घेतले. त्यापाठोपाठ हैदराबादच्या संघाने फक्त 3 खेळाडू नवी घेतले.
9:17 pm (IST)
Load More