मुंबई, 23 सप्टेंबर: रवींद्र जाडेजा सध्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण जाडेजाच्या आयपीएल खेळण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मध्यंतरी जाडेजा आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आयपीएल 2022 त्या पार्श्वभूमीवर संघात अनेक घडामोडीही घडल्या. आणि जाडेजा सीएसके सोडणार अशी चर्चा सुरु झाली. पण आता जाडेजा खरंच सीएसके सोडणार का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
जाडेजा सीएसकेतच राहणार
क्रिकबझनं दिलेल्या बातमीनुसार रवींद्र जाडेजाला दिल्ली कॅपिटल्ससह अनेक आयपीएल फ्रँचायझीजकडून ऑफर आल्या होत्या. आगामी ऑक्शनमध्ये जाडेजावर हे संघ बोली लावण्यासाठी इच्छुक होते. पण जाडेजानं यापैकी कोणतीही ऑफर स्वीकारली नाही. इतकच नाही तर आता चेन्नई सुपर किंग्सनं जाडेजा सीएसके सोडण्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. सीएसकेनं म्हटलंय की जाडेजा जगातला सर्वोत्तम ऑलराऊंडर आहे. त्यामुळे त्याच्यापासून फारकत घेण्याची कोणतीही योजना नाही. जाडेजासह शुभमन गिलदेखील गुजरात टायटन्सला सोडणार अशी चर्चा होती. पण गुजरातनंही हे खरं नसल्याचं सांगितलं आहे.
Couple of IPL franchises including Delhi Capitals requested CSK for a trade of Ravindra Jadeja, but CSK didn't accept the trade. (Reported by Cricbuzz).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 23, 2022
हेही वाचा - CPL T20: मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनची कॅरेबियन बेटांवर कमाल; सहा बॉलमध्ये ठोकले 5 सिक्स, पाहा Video
डिसेंबरमध्ये खेळाडूंचं ऑक्शन?
आयपीएलच्या 16 व्या सीझनला मार्चच्या अखेरीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार 16 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता आहे. या लिलावात प्रत्येक संघाला 95 कोटी रुपये खर्च करण्याची मुभा दिली जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम पाच कोटींपेक्षा जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl, Ravindra jadeja, Sports, T20 cricket