मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सनरायजर्स हैदराबादने निवडला नवा कर्णधार; सर्वाधिक वेळा नेतृत्व बदलणारा तिसरा संघ

सनरायजर्स हैदराबादने निवडला नवा कर्णधार; सर्वाधिक वेळा नेतृत्व बदलणारा तिसरा संघ

sunrisers hyderabad

sunrisers hyderabad

2016 मध्ये आय़पीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 16साठी मिनी लिलावाआधी कर्णधार केन विल्यम्सनला रिलीज केलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 फेब्रुवारी : आयपीएल 2023 साठी सनरायजर्स हैदराबादने नव्या कर्णधाराची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्करमकडे सनरायजर्सचे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. नव्या हंगामात त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करताना तो दिसेल. सनरायजर्स हैदराबादने ट्विटरवरून नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिका 20 लीगच्या आधी पहिल्या हंगामात सनरायजर्स इस्टर्न कॅप मार्करमच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन झाले आहे.

2016 मध्ये आय़पीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 16साठी मिनी लिलावाआधी कर्णधार केन विल्यम्सनला रिलीज केलं होतं. त्यानंतर मयंक अग्रवाल, एडन मार्करम आणि भुवनेश्वर कुमार हे कर्णधारपदाचे दावेदार मानलं जात होतं. मात्र सनरायजर्सने मार्करमवर विश्वास दाखवत त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे.

हेही वाचा : भारतीयांंनो इकडे लक्ष द्या! हरमनप्रीत कुठेय? रोहित-हार्दिकचा फोटो शेअर करत युवीचा प्रश्न

एडन मार्करमने सनरायजर्सच्या इस्टर्न कॅपला पहिल्या हंगामात चॅम्पियन बनवून कमाल केलीय. दक्षिण आफ्रिका 20लीगमध्ये एडनने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने336 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या. यात त्याने सेमीफायनलमध्ये शतकही झळकावलं आहे. आयपीएल कारकिर्दीत त्याने आतापर्यंत दोन हंगाम खेळले आहेत. यात 2021 च्या 6 सामन्यात 146 धाव केल्या, तर 2022 मध्ये 14 सामन्यात 381 धावा केल्या. यात त्याने तीन अर्धशतकेही केली.

सर्वाधिक वेळा कर्णधार बदलणारा तिसरा संघ

आतापर्यंत किंग्ज पंजाब इलेव्हनने 14 वेळा कर्णधार बदलले आहेत. तर दिल्लीने 12 वेळा. यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने ९ कर्णधार बदलले आहेत. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे 7  कर्णधार झालेत तर राजस्थान रॉयल्स, केकेआर यांचे 6 कर्णधार झाले आहेत. तर सर्वात कमी कर्णधार चेन्नई सुपरकिंग्जने बदलले आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2023