मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : मोठी बातमी! मुंबई इंडियन्सला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट

IPL 2023 : मोठी बातमी! मुंबई इंडियन्सला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट

मोठी बातमी! मुंबई इंडियन्सला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट

मोठी बातमी! मुंबई इंडियन्सला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट

आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट मिळाली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च : आयपीएल 2023  ला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा मुंबईचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. तेव्हा मुंबई इंडियन्समध्ये बुमराहची जागा कोण घेणार याविषयी चर्चा असताना मुंबई इंडियन्सला आता बुमराहची रिप्लेसमेंट मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरिअर मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराहचा बदली खेळाडू म्हणून सामील होणार आहे. 2021 मध्ये भारतासाठी पदार्पण करणारा संदीप हा देशांतर्गत क्रिकेटमधला एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत  200 हून अधिक सामने खेळले असून त्यापैकी 69 सामने हे टी-20 फॉरमॅटमधील आहेत.  त्याने आतापर्यंतच्या सर्व फॉरमॅटमध्ये त्याच्या कारकिर्दीत 362 विकेट घेतल्या आहेत.

2 एप्रिल मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार आहे. तेव्हा या सामन्यापूर्वी संदीप वॉरिअर हा मुंबई संघात सामील होईल. मुंबई संघाला जसप्रीतची रिप्लेसमेंट मिळाल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, Jasprit bumrah, Mumbai Indians