मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : JioCinema चा रेकॉर्ड, पहिल्या 7 आठवड्यात 1500 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज

IPL 2023 : JioCinema चा रेकॉर्ड, पहिल्या 7 आठवड्यात 1500 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी पहिली क्वालिफायर मॅच झाली. या वेळी पुन्हा एकदा आयपीएलमधली सर्वाधिक दर्शकांची संख्या जिओ सिनेमाने गाठली

  मुंबई, 26 मे : जिओ सिनेमा हा आयपीएल 2023 चा अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर आहे. या प्लॅटफॉर्मवर खेळाच्या ह्यूअरशिपच्या बाबतीत त्याने जागतिक विक्रम मोडला आहे. पहिल्या सात आठवड्यांत आयपीएलला 1500 कोटींपेक्षा जास्त व्हिडिओ व्ह्यूज मिळाले आहेत.

  चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी पहिली क्वालिफायर मॅच झाली. या वेळी पुन्हा एकदा आयपीएलमधली सर्वाधिक दर्शकांची संख्या जिओ सिनेमाने गाठली. दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कॉन्करन्सी 2.5 कोटींपर्यंत वाढली. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घातल्याचं यावरून दिसून येतं.

  2019मध्ये 18.7 Mn दर्शकसंख्येचा विक्रम मागे टाकून आयपीएलचा हा सीझन डिजिटल कॉन्करन्सीच्या बाबतीत गेम चेंजर ठरला. उल्लेखनीय म्हणजे, या सीझनमधल्या 13हून अधिक मॅचेसनी 18 दशलक्षचा सर्वोच्च कॉन्करन्सी बेंचमार्क ओलांडला आहे.

  (IPL 2023 : किंमत कमी पण कामात शेर, प्ले-ऑफमध्ये मुंबईचे 5 खेळाडू ठरणार एक्स-फॅक्टर)

  जिओसिनेमाने यापूर्वी दोनवेळा आयपीएलचा पीक कॉन्करन्सी विक्रम मोडला आहे. 12 एप्रिल रोजी या प्लॅटफॉर्मने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या मॅचदरम्यान सर्वाधिक 2.23 कोटींचा आकडा गाठला. पाच दिवसांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या मॅचदरम्यान कॉन्करन्सी 2.4 एवढी होती. त्यामुळे आधीचा विक्रम मोडला.

  अभूतपूर्व प्रतिसादानंतर जिओसिनेमाने चाहत्यांना आनंद देण्यासाठी 360 डिग्री व्ह्यूइंग फीचर जारी केलं. यामुळे या डिजिटल प्लॅटफॉर्मची उच्च क्षमता दिसून आली आणि चाहते त्याकडे आकर्षित झाले. प्रेक्षकांनी भोजपुरी, पंजाबी, मराठी आणि गुजराती या भाषांतल्या फीडसह मल्टी कॅम, 4k हाइप मोड यासारख्या डिजिटल फीचर्सचा आनंद घेतला. याशिवाय रोमांचक, अ‍ॅक्शनपॅक्ड आणि दर्जेदार कंटेंटसह हायलाइट्स, विराट कोहली, हार्दिक पांड्या, फाफ डू प्लेसिस, रशिद खान, डेव्हिड मिलर यांसारख्या आयपीएल टीम्समधल्या टॉप क्रिकेटर्सच्या मुलाखतींचा आनंद प्रेक्षकांनी घेतला.

  (क्रिकेटवेड्या मुलामुळे वडिलांनी करून घेतली बदली, आईही झाली नाराज; IPL गाजवतोय)

  TATA IPL 2023च्या डिजिटल स्ट्रीमिंगसाठी जिओसिनेमाने 26 टॉप ब्रँड्सशी भागीदारी केली आहे. त्यामध्ये (को-प्रेझेंटिंग स्पॉन्सर) ड्रीम 11, (को-पॉवर्ड) जिओमार्ट, फोनपे, टियागो ईव्ही, जिओ (असोसिएट स्पॉन्सर) अ‍ॅप्पी फिझ, ईटी मनी, कॅस्ट्रॉल, टीव्हीएस, ओरिओ, बिंगो, स्टिंग, एजिओ, हेअर, रूपे, लुईस फिलिप जीन्स, अ‍ॅमेझॉन, रॅपिडो, अल्ट्रा टेक सिमेंट, प्युमा, कमला पसंद, किंगफिशर पॉवर सोडा, जिंदाल पँथर टीएमटी रेबर, सौदी टुरिझम, स्पॉटिफाय, एएमएफआय यांचा समावेश आहे.

  First published:
  top videos

   Tags: IPL 2023