मुंबई, 01 एप्रिल : आयपीएल २०२३ च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातने बाजी मारत विजयी सुरुवात केली. तर मुंबई इंडियन्सचा संघ आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी बंगळुरुत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी सायंकाळी साडे सात वाजता एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगामातला हा मुंबईचा पहिलाच सामना असेल.
मुंबई इंडियन्सचे खेळाडू पहिल्या सामन्यासाठी बंगळुरूत दाखल झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सरावही केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जोफ्रा आर्चर सराव करताना दिसले. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवेल. दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आहे. तर नवोदीत खेळाडू संदीप वारियर हा संघासोबत सरावावेळी उपस्थित होता.
IPL 2023 : धोनी पुढचे सामने खेळणार की नाही? CSKच्या प्रशिक्षकांनी दुखापतीबाबत दिले अपडेट्स
! #OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL pic.twitter.com/7Qz46mTQgQ
— Mumbai Indians (@mipaltan) April 1, 2023
मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, टिम डेविड, पीयूष चावला, कॅमेरून ग्रीन, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकिन, जेसन बेहरेनडॉर्फ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2023, Rohit Sharma