मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023 | CSKचा कॅप्टन धोनी राहणार की जाणार? मोठी अपडेट आली समोर

IPL 2023 | CSKचा कॅप्टन धोनी राहणार की जाणार? मोठी अपडेट आली समोर

IPL २०२३ मध्ये चेन्नईचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे असणार आहे. पुढच्यावर्षी देखील महेंद्रसिंह धोनी खेळताना दिसणार आहे.

IPL २०२३ मध्ये चेन्नईचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे असणार आहे. पुढच्यावर्षी देखील महेंद्रसिंह धोनी खेळताना दिसणार आहे.

IPL २०२३ मध्ये चेन्नईचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे असणार आहे. पुढच्यावर्षी देखील महेंद्रसिंह धोनी खेळताना दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : CSK चा पुढचा कर्णधार कोण? यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चा रंगली आहे. चेन्नई फ्रान्चायझीने यावर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. आयपीएल २०२२ मध्ये महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडून रविंद्र जडेजाकडे सुपूर्द केलं. मात्र जडेजाने मध्येच कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नईची धुरा धोनीकडे आली. पण IPL 2023 चं काय असा प्रश्न होताच. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

IPL २०२३ मध्ये चेन्नईचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे असणार आहे. पुढच्यावर्षी देखील महेंद्रसिंह धोनी खेळताना दिसणार आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा आनंद झाला आहे. सोशल मीडियावरही धोनीला अभिनंदन केलं जात आहे. आयपीएल २०२३ साठी कर्णधारपदाची धुरा धोनी सांभाळणार आहे.

हेही वाचा- रविंद्र जडेजा T20 World Cup मधून बाहेर? कोचकडून मोठा खुलासा पाहा VIDEO

धोनी चेन्नईचा कर्णधार असेल यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं फ्रान्चायझीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला आहे. सोशल मीडियावर धोनीचा ट्रेन्ड सुरू झाला आहे. आयपीएलची सुरुवात २००८ पासून झाली. तेव्हापासून चेन्नई टीमचा कर्णधार धोनीच होता. २०२२ आयपीएल सुरू होण्याआधी धोनीनं कर्णधारपद सोडलं.

रविंद्र जडेजाकडे ही जबाबदारी देण्यात आली. मात्र टीमची कामगिरी चांगली होत नव्हती आणि जडेजाच्या खेळावरही परिणाम होत असल्याचं दिसत होतं. जडेजाने कर्णधारपद सोडलं. त्यानंतर धोनीकडे पुन्हा ही जबाबदारी आली.

रविंद्र जडेजाला कर्णधारपद सोडावं लागलं की त्याने स्वत:हून सोडलं याबाबत अनेक मतभेद आहेत. मात्र फ्रान्चायझीने पुन्हा धोनीकडेच ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता धोनी शेवटचं आयपीएल खेळणार की नाही या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

First published:

Tags: Csk, MS Dhoni