मुंबई, 31 मार्च : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात या संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात मोहम्मद शमी याने आयपीएलच्या 16 व्या सीजनमधली पहिली विकेट घेतली आहे.
आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गत विजेत्या गुजरात टायटन यांच्यात सुरु आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे हे दोन फलंदाज मैदानात उतरले. परंतु तिसरी ओव्हर सुरु असतानाच गुजरातला चेन्नई संघाच्या डेव्हॉन कॉन्वेची विकेट घेण्यात यश आले. ही विकेट मोहम्मद शमीच्या आयपीएल करिअरमधली 100 वी विकेट ठरली.
A cracking delivery to get his 1⃣0⃣0⃣th IPL wicket 🔥🔥@MdShami11 picks the first wicket of #TATAIPL 2023!
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#GTvCSK pic.twitter.com/hN0qgJ2rFo — IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
गुजरात संघाकडून मोहम्मद शमीने डेव्हॉन कॉन्वेची विकेट घेतली. डेव्हॉन कॉन्वे 6 चेंडूवर केवळ 1 धाव करून बाद झाला. डेव्हॉन कॉन्वेची ही विकेट आयपीएल 2023 मधील पहिली विकेट ठरली असून ती घेण्यात मोहम्मद शमीला यश आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, CSK, IPL 2023, MS Dhoni