मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : पहिल्या लढतीसाठी मुंबई सज्ज, या Playing XI सह रोहित मैदानात उतरणार!

IPL 2023 : पहिल्या लढतीसाठी मुंबई सज्ज, या Playing XI सह रोहित मैदानात उतरणार!

आयपीएलमध्ये रोहित-विराट भिडणार

आयपीएलमध्ये रोहित-विराट भिडणार

आयपीएल 2023 च्या आपल्या पहिल्या मुकाबल्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज आहे. मुंबईचा मोसमातला पहिलाच सामना आरसीबीविरुद्ध होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bangalore, India

बँगलोर, 2 एप्रिल : आयपीएल 2023 च्या आपल्या पहिल्या मुकाबल्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज आहे. मुंबईचा मोसमातला पहिलाच सामना आरसीबीविरुद्ध होणार आहे. बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होईल. आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. मागच्या सिझनमध्ये मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. यावेळी मात्र मागच्या वर्षीचं रेकॉर्ड धुवून काढण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

आयपीएल सुरू व्हायच्या आधीच मुंबई इंडियन्सना मोठा धक्का बसला. टीमचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला आहे. पण इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर या मोसमासाठी उपलब्ध आहे, ज्यामुळे मुंबईला थोडाफार दिलासा मिळाला आहे.

आयपीएल लिलावामध्ये मुंबईने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला विकत घेतलं. तसंच ऑस्ट्रेलियाचा आणखी एक डावखुरा फास्ट बॉलर जेसन बेहरनडॉर्फलाही संधी मिळू शकते. मुंबईने शेवटच्या क्षणी बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून संदीप वॉरियरची घोषणा केली आहे. या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशनची ओपनिंग जोडी जवळपास निश्चित आहे. अर्जुन तेंडुलकरला या मोसमात तरी खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसरीकडे आरसीबीच्या टीमकडे पाहिलं तर विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस ओपनिंगला येतील, तर ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक मिडल ऑर्डरमध्ये खेळतील. बॉलिंगची जबाबदारी हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद यांच्यावर असेल. मुंबईप्रमाणेच आरसीबीलाही दुखापतींचा फटका बसला आहे. जॉश हेजलवूड काही मॅच खेळणार नाही, तर विल जॅक्स पूर्ण मोसम बाहेर झाला आहे.

मुंबईची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, कॅमरून ग्रीन, रमणदीप सिंग, जोफ्रा आर्चर, ऋतिक शौकीन, संदीप वॉरियर, जेसन बेहरेनडॉर्फ

आरसीबीची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन

फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, रिस टॉपली, मोहम्मद सिराज

First published:
top videos

    Tags: IPL 2023, Mumbai Indians, RCB