मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : आजपासून IPL च्या 'रन'संग्रामाला सुरुवात, इथे पाहता येणार आयपीएलच्या सर्व मॅच

IPL 2023 : आजपासून IPL च्या 'रन'संग्रामाला सुरुवात, इथे पाहता येणार आयपीएलच्या सर्व मॅच

आजपासून IPL च्या 'रन'संग्रामाला सुरुवात, इथे पाहता येणार आयपीएलच्या सर्व मॅच

आजपासून IPL च्या 'रन'संग्रामाला सुरुवात, इथे पाहता येणार आयपीएलच्या सर्व मॅच

आज पासून इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 16 व्या सीजनचा पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन यांच्यात रंगणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च : जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला आज पासून प्रारंभ होत आहे. 16 व्या सीजनचा पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन यांच्यात हा सामना रंगेल. यंदाच्या आयपीएलसाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक असून यंदाही प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.

आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये यंदा 10 संघांचा समावेश आहे. यात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स,  कोलकाता नाईट रायडर्स,  दिल्ली चॅलेंजर्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स इत्यादी संघांचा समावेश आहे. आयपीएल सीजन सुरु झाल्यावर एका दिवशी दोन सामने असल्यास पहिला सामना दुपारी 03:30 वाजता तर दुसरा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल. यंदा तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचे सामने संघांच्या होम ग्राउंडवर रंगणार आहेत. भारतातील 10 शहरांमधील क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन केले जाईल. आयपीएल मध्ये  एकूण 52 दिवसांमध्ये सुमारे 70 लीग सामने खेळले जातील. तर फायनलचा सामना 1 जून रोजी खेळवला जाईल.

गेल्यावर्षी बीसीसीआयने 2023-27 सायकलसाठी टेलिव्हिजन मीडिया हक्क स्टार इंडिया आणि वायकॉम 18 समूहाला डिजिटल हक्क विकले आहेत. यातून बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहणे शक्य होईलच असे नाही. तेव्हा घर बसल्या तसेच जगाच्या पाठीवर कोठेही असताना ऑनलाईन किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत.

कुठे पाहता येणार सामने ?

IPL 2023 चे सामने मागील आवृत्त्यांप्रमाणेच टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर प्रसारित केले जातील. हे सामने SD आणि HD मध्ये, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत प्रसारित केले जातील. तर 2022 च्या FIFA वर्ल्ड कप प्रमाणेच 2023 चे IPL सामने जिओ सिनेमा अॅपवर विनामूल्य दाखवले जाणार आहेत. जिओने जाहीर केल्यानुसार आयपीएलसह सामने प्रेक्षकांना 4k रिझोल्यूशनमध्ये पाहता येतील आणि संपूर्ण भारतात 12 भाषांमध्ये उपलब्ध असतील.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Csk, IPL 2023, Mumbai Indians