मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2023 साठी आरसीबीने रिलीज केलेल्या आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आरसीबीने त्यांच्या टीममध्ये फारसे बदल केलेले नाहीत. आरसीबीने मागच्यावर्षीच्या पाच खेळाडूंना रिलीज केलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघर्ष करणाऱ्या दिनेश कार्तिकला आरसीबीने टीममध्ये कायम ठेवलं आहे.
आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू
जेसन बेहरनडॉर्फ, अनीश्वर गौतम, चमा मिलिंद, लुवनित सिसोदिया, शरफेन रदरफोर्ड
शिल्लक असलेली रक्कम
8.75 कोटी रुपये
आरसीबी लिलावात जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू विकत घेऊ शकते
आरसीबीने रिटेन केलेले खेळाडू
फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप
रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर आता 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठीचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी म्हणजेच 15 नोव्हेंबरला रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला देणं प्रत्येक 10 टीमना बंधनकारक होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.