मुंबई, 31 मार्च : आयपीएल 2023 चे बिगुल आज वाजणार आहे. जगप्रसिद्ध टी 20 लीग असणाऱ्या आयपीएलचा पहिला सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आज तब्बल 4 वर्षांनी आयपीएलचा दिमाखदार ओपनिंग सेरेमनीचा सोहळा पारपडणार असून हा सोहळा क्रीडा रसिकांचे डोळे दिपवणारा ठरणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात रंगणार असून या सामन्याला सायंकाळी 7:30 वाजता सुरुवात होणार आहे. तर यापूर्वी ओपनिंग सेरेमनी सायंकाळी 5 च्यासुमारास सुरु होईल. आयपीएलच्या ओपनिंग सोहोळ्यात बॉलिवूड स्टार्स त्यांच्या परफॉर्मन्सने तडका मारणार आहेत. यात माहितीनुसार तमन्ना भाटिया, रश्मीका मंधाना, अर्जित सिंह , टायगर श्रॉफ इत्यादी स्टार्स आयपीएलच्या ओपनिंग सोहोळ्यात परफॉर्म करणार आहेत.
IPL 2023 opening ceremony will have this kind of drone show. It's going to be a lovely evening at Narendra Modi Stadium!#IPL2023 pic.twitter.com/qLougHAery
— Purnesh Modi (@purneshmodi) March 31, 2023
सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सह यावेळी क्रीडा रसिकांना ड्रोन शो देखील पाहायला मिळणार आहे. या ड्रोन शोसाठी मागील अनेक दिवसांपासून पूर्व तयारी सुरु असून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ड्रोन शोसाठी काही हजार ड्रोनचा यात वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळ दृश्य अनुभवायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Csk, IPL 2023