मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 CSK VS GT : गुजरातची विजयी सलामी! धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्याच सामन्यात पाजलं पाणी

IPL 2023 CSK VS GT : गुजरातची विजयी सलामी! धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्याच सामन्यात पाजलं पाणी

गुजरातची विजयी सलामी! धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्याच सामन्यात पाजलं पाणी

गुजरातची विजयी सलामी! धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्याच सामन्यात पाजलं पाणी

आयपीएल 2023 ला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केला आहे. गुजरातने हा सामना 5 विकेट्सने जिंकला असून यासोबतच आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये विजयी सलामी दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च : आयपीएल 2023 ला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला असून या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केला आहे. गुजरातने हा सामना 5 विकेट्सने जिंकला असून यासोबतच आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये विजयी सलामी दिली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यायाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची सुरुवात काहीशी खराब झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये चेन्नईची विकेट पडली. मोहम्मद शमीने डेव्हॉन कॉन्वेयाची विकेट घेतली. ही विकेट शमीच्या आयपीएल कारकिर्दीतील शंभरावी विकेट ठरली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने चेन्नई संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ऋतुराजने जबरदस्त फलंदाजी करून 50 चेंडूत 92 धावा ठोकल्या. यात 9 सिक्स सह 4 चौकारांचा समावेश होता. परंतु त्याचे शतक थोडक्यात हुकेल आणि अल्झारी जोसेफच्या चेंडूवर तो झेल बाद झाला. चेन्नईच्या सहा विकेट पडलेल्या असताना रवींद्र जडेजा मैदानात आला पण तो देखील केवळ 1 धाव करून बाद झाला. परंतु शेवटच्या षटकात मैदानात एम एस धोनीची तलवार तळपली आणि त्याने केवळ ७ चेंडूत १४ धावा केल्या.

चेन्नईने फलंदाजी करताना 20 षटकात 178 धावा करून गुजरातला179 धावांचे आव्हान दिले.  हे आव्हान पार करण्यासाठी  शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा हे दोघे सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले. परंतु चौथ्या षटकात वृद्धिमान साहा 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने गुजरात संघाची बाजू सावरली. त्याने 36 चेंडूत 63 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीचा शिकार झाला आणि त्याला केवळ 8 धावा करून माघारी फिरावे लागले. सामना चेन्नईकडे झुकतो असे वाटत असताना गुजरातचा फलंदाज राहुल तेवाटीयाने जबरदस्त खेळी करून संघाला सामना जिंकून दिला.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, IPL 2023, MS Dhoni