मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : आयपीएलचा 'रन'संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक, आणि कुठे पाहता येणार सामने?

IPL 2023 : आयपीएलचा 'रन'संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक, आणि कुठे पाहता येणार सामने?

आयपीएलचा 'रन'संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक, आणि कुठे पाहता येणार सामने?

आयपीएलचा 'रन'संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक, आणि कुठे पाहता येणार सामने?

इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 'रन'संग्रामाला प्रारंभ होणार असून पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र स्टेडियमवर रंगणार आहे. तब्बल दोन महिने ही स्पर्धा सुरु होणार राहणार असून यंदाच्या 16 व्या सीजनची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च : जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे.  31 मार्च पासून आयपीएलच्या 'रन'संग्रामाला प्रारंभ होणार असून पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र स्टेडियमवर रंगणार आहे. तब्बल दोन महिने आयपीएलची स्पर्धा रंगणार असून यंदाच्या 16 व्या सीजनची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये यंदा 10 संघांचा समावेश आहे. यात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स,  कोलकाता नाईट रायडर्स,  दिल्ली चॅलेंजर्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स इत्यादी संघांचा समावेश आहे. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्च शनिवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

आयपीएल सीजन सुरु झाल्यावर एका दिवशी दोन सामने असल्यास पहिला सामना दुपारी 03:30 वाजता तर दुसरा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल. यंदा तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचे सामने संघांच्या होम ग्राउंडवर रंगणार आहेत. भारतातील 10 शहरांमधील क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन केले जाईल. आयपीएलमध्ये  एकूण 52 दिवसांमध्ये सुमारे 70 लीग सामने खेळले जातील. तर फायनलचा सामना 1 जून रोजी खेळवला जाईल.

IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान

कुठे पाहाल सामने :

IPL 2023 च्या सामन्यांचे थेट प्रसारण JioCinema वर केले जाणार आहेत. तसेच टेलिव्हिजनवर याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर करण्यात येईल.

आयपीएलचे संपूर्ण शेड्युल:

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Csk, IPL 2023, KKR, Mumbai Indians, RCB