मुंबई, 21 मार्च : आयपीएल 2023 ला आजपासून सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात टायटन यांच्यात रंगणार असून याकरता क्रीडा रसिकांमध्ये उत्सुकतात आहे. दरम्यान अहमदाबाद येथे पोहोचलेला चेन्नई सुपरकिंग्सचा संघ जलेबी फाफडा खाण्यासाठी तुटून पडला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई आणि गुजरात यांच्यात पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याने चेन्नई आणि गुजरातचा संघ अहमदाबाद येथे दोन दिवसांपूर्वीच दाखल झाले आहेत. गुरुवारी स्टेडियमवर चेन्नईचा संघ सराव करत असताना अचानक पाऊस पडला. यावेळी सर्व खेळाडू पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये परतले. यावेळी संघासाठी गुजरातमधील प्रसिद्ध खाद्य जलेबी फाफडा आणलेला होता.
Choosing the right rain snack ✅#WhenInGujarat #WhistlePodu pic.twitter.com/FyskXh1URj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 30, 2023
पावसामुळे काहीसे भिजलेले सर्व खेळाडू जलेबी फाफडा पाहताच त्याच्यावर तुटून पडले. धोनी, दीपक चहर सोबतच अनेक विदेशी खेळाडूंनी देखील याचा आनंद घेतला. संघाचा हा व्हिडिओ चेन्नई सुपरकिंग्सने सोशल मीडियावर टाकला असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Csk, IPL 2023, MS Dhoni