Home /News /sport /

IPL 2022 : BCCI ने आयपीएलमध्ये केला मोठा बदल, फायनलमध्ये दिसणार जुना 'फॉरमॅट'!

IPL 2022 : BCCI ने आयपीएलमध्ये केला मोठा बदल, फायनलमध्ये दिसणार जुना 'फॉरमॅट'!

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. आतापर्यंत 15व्या मोसमाच्या 66 मॅच झाल्या आहेत आणि लीग स्टेजच्या फक्त 4 मॅच शिल्लक आहेत, त्यातच आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 16व्या मोसमाबाबत (IPL 2023) मोठी घोषणा केली आहे.

    मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. आतापर्यंत 15व्या मोसमाच्या 66 मॅच झाल्या आहेत आणि लीग स्टेजच्या फक्त 4 मॅच शिल्लक आहेत, त्यातच आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 16व्या मोसमाबाबत (IPL 2023) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल 2023 च्या वेळेमध्ये बदल केला आहे. आतापर्यंत दुपारच्या मॅच 3.30 वाजता सुरू व्हायचा, तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजता खेळवले जायचे. क्रिकबझच्या वृत्तानुसार बीसीसीआयने संभाव्य प्रसारणकर्त्यांना याबाबत माहिती दिली आहे. आयपीएल 2023 च्या मॅच रात्री 8 वाजता सुरू होतील, तसंच डबल हेडर असतील तेव्हा पहिला सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाईल. तसंच डबल हेडर मॅचची संख्याही कमी केली जाईल हेदेखील बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयने ही माहिती आयपीएल प्रसारणाचे अधिकार विकत घेऊ इच्छिणाऱ्या चॅनलना दिली आहे. पुन्हा जुनी वेळ आयपीएलची पहिली 10 वर्ष मॅच दुपारी 4 आणि रात्री 8 वाजता खेळवल्या जायच्या, पण त्यावेळी स्टार स्पोर्ट्सने प्रसारणाचे अधिकार घेतले नव्हते. स्टार स्पोर्ट्सने आयपीएल प्रसारणाचे अधिकार विकत घेतल्यानंतर बीसीसीआयला वेळ बदलण्याची विनंती केली, जी बोर्डाने मान्य केली. स्टार स्पोर्ट्सने 2018 साली पाच वर्षांसाठी प्रसारणाचे अधिकार विकत घेतले. आयपीएल 2023 साठी वेळ बदलणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं असलं, तरी यावर्षी होणारी फायनलही रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 जूनला लिलाव आयपीएल 2022 संपल्यानंतर 12 जूनला पुढच्या 5 वर्षांसाठी म्हणजेच 2023-2027 साठी प्रसारण अधिकारांसाठी बोली लावण्यात येणार आहे. बोली लावण्यासाठी अर्धा डझनपेक्षा जास्त कंपन्यांनी कागदपत्र विकत घेतली आहेत. यामध्ये स्टार इंडिया, Viacom 18, अमेझॉन, झी,ड्रीम इलेव्हन, दक्षिण आफ्रिकेचं सुपरस्पोर्ट्स चॅनल समूह आणि युकेचं स्काय स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. याशिवाय गुगलनेही आयपीएल प्रसारणाचे अधिकार विकत घेण्यात रस दाखवला आहे. या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Ipl 2022

    पुढील बातम्या