Home /News /sport /

विराटच्या चाहत्यांना मिळणार गुड न्यूज? किंग कोहली पुन्हा होणार Captain!

विराटच्या चाहत्यांना मिळणार गुड न्यूज? किंग कोहली पुन्हा होणार Captain!

ऑक्टोबर 2021 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) हा भारताच्या तिन्ही फॉरमॅट आणि आयपीएलच्या आरसीबीचा (RCB) कर्णधार होता, पण तीनच महिन्यात विराट कोहलीकडे कोणत्याही फॉरमॅटची कॅप्टन्सी नाही.

    मुंबई, 29 जानेवारी : ऑक्टोबर 2021 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) हा भारताच्या तिन्ही फॉरमॅट आणि आयपीएलच्या आरसीबीचा (RCB) कर्णधार होता, पण तीनच महिन्यात विराट कोहलीकडे कोणत्याही फॉरमॅटची कॅप्टन्सी नाही. आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा राऊंड सुरू व्हायच्या आधीच विराट कोहलीने कॅप्टन म्हणून आरसीबीचा हा आपला शेवटचा मोसम असेल, असं घोषित केलं. तसंच भारताच्या टी-20 टीमची कॅप्टन्सीही वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) सोडणार असल्याचं विराट म्हणाला होता. टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅट तसंच आरसीबीची कॅप्टन्सी आणि त्यात बायो-बबल या तणावामुळे आपण टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडत असल्याचं कारण विराटने तेव्हा दिलं होतं. विराट कोहलीने कॅप्टन्सीच्या तणावाचं कारण दिलं तेव्हा तो भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार होता. तसंच आपण भविष्यातही दोन फॉरमॅटचे कर्णधार राहू असं विराटला तेव्हा वाटत होतं, पण तीनच महिन्यांमध्ये ही परिस्थिती बदलली, त्यामुळे आता विराट पुन्हा एकदा आरसीबीची कॅप्टन्सी स्वीकारू शकतो, अशा चर्चा सुरू आहेत. विराट आता टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन नाही, त्यामुळे त्याच्यावरचा तणाव कमी झाला आहे. तसंच आयपीएलमध्ये त्याला फक्त दोनच महिने टीमचं नेतृत्व करायचं आहे. तीन महिन्यांमध्ये बदलली परिस्थिती टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर बीसीसीआय आणि निवड समितीने विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवलं. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा आहे, असं सांगत विराटऐवजी रोहित शर्माला टी-20 पाठोपाठ वनडेचंही कर्णधार करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर विराटने टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडून दिली. मागच्या तीन महिन्यांमध्ये परिस्थिती अशी बदलेल याचा विचार विराटने स्वप्नातही केला नसेल. सिद्ध करण्यासाठी कॅप्टन होणार? विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, तसंच त्याला आरसीबीलाही चॅम्पियन बनवता आलं नाही. या रेकॉर्डवरूनही विराटच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. आता स्वत:ची कॅप्टन्सी सिद्ध करण्यासाठी आणि एकही ट्रॉफी जिंकवली नसल्याचं रेकॉर्ड सुधारण्यासाठी विराट पुन्हा एकदा आरसीबीच्या कॅप्टन्सीची जबाबदारी स्वीकारू शकतो. निवृत्त होईपर्यंत आपण आरसीबीकडून खेळणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं आहे. आयपीएल 2022 साठी आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना रिटेन केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार केलं नाही तर आरसीबीला लिलावात कर्णधारपदासाठी उपयुक्त असलेल्या खेळाडूवर बोली लागावी लागेल, यासाठी त्यांना जास्त रक्कमही खर्च करावी लागेल, पण विराट जर कॅप्टन्सीसाठी तयार झाला तर आरसीबीला एकाच खेळाडूवर जास्त पैसे मोजण्याऐवजी चांगली टीमही बांधता येईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या