मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : पराभवाच्या सिक्सरनंतर मुंबई 'लाज' तरी वाचवणार?, इतिहासातल्या खराब कामगिरीची टांगती तलवार

IPL 2022 : पराभवाच्या सिक्सरनंतर मुंबई 'लाज' तरी वाचवणार?, इतिहासातल्या खराब कामगिरीची टांगती तलवार

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव झाला. एकही विजय न मिळवलेली मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव झाला. एकही विजय न मिळवलेली मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या 6 मॅच गमावल्यामुळे आता मुंबईचं प्ले-ऑफमध्ये (IPL Play Offs) पोहोचणंही जवळपास अशक्य झालं आहे. आयपीएलच्या 15 मोसमांमधली मुंबईची ही सगळ्यात खराब सुरूवात आहे.

आयपीएलमध्ये प्रत्येक टीम लीग स्टेजमध्ये 14 मॅच खेळते, यानंतर पॉईंट्स टेबलमधल्या टॉप-4 टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतात. आयपीएलच्या लीग स्टेजच्या 14 मॅचनंतर सगळ्यात खराब कामगिरी दिल्ली आणि हैदराबादच्या नावावर आहे.

आयपीएल 2014 मध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्सने (Delhi Dare Devils) फक्त 2 मॅच जिंकत 4 पॉईंट्स मिळवले होते. 2014 साली दिल्लीच्या टीममध्ये केव्हिन पीटरसन, जेपी ड्युमिनी, क्विंटन डिकॉक, दिनेश कार्तिक, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी हे दिग्गज खेळाडू होते, पण तरीही दिल्लीची कामगिरी लाजिरवाणी झाली होती.

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात म्हणजेच 2008 साली डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) हैदराबादनेही फक्त 2 मॅच जिंकून 4 पॉईंट्स कमावले होते, त्यावेळी हैदराबादच्या टीममध्ये एडम गिलख्रिस्ट, शाहिद आफ्रिदी, एन्ड्रयू सायमंड्स, चामिंडा वास, रोहित शर्मा, आरपी सिंग हे दिग्गज खेळाडू होते. 2008 च्या या खराब कामगिरीनंतर 2009 साली मात्र हैदराबादने आयपीएल ट्रॉफी जिंकली.

आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात खराब कामगिरीपासून वाचायचं असेल तर मुंबईला आता उरलेल्या 8 मॅचपैकी निदान 3 मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सची आयपीएलमधली सगळ्यात खराब कामगिरी 2009 साली झाली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या त्या आयपीएलमध्ये मुंबईच्या खात्यात फक्त 11 पॉईंट्स आले. यंदा मुंबईला 8 पैकी 6 मॅच जिंकता आल्या नाहीत, तर 15 मोसमांमधल्या सगळ्यात खराब कामगिरीची नोंद याचवेळी होईल.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians