मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 होणार आणखी रोमांचक, फक्त 10 टीमच नाही तर... सौरव गांगुलीने दिली मोठी Update

IPL 2022 होणार आणखी रोमांचक, फक्त 10 टीमच नाही तर... सौरव गांगुलीने दिली मोठी Update

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरुवातीला भारतात खेळवली गेली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली आणि दुसरा राऊंड युएईमध्ये खेळवला गेला.

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरुवातीला भारतात खेळवली गेली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली आणि दुसरा राऊंड युएईमध्ये खेळवला गेला.

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरुवातीला भारतात खेळवली गेली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली आणि दुसरा राऊंड युएईमध्ये खेळवला गेला.

दुबई, 16 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) सुरुवातीला भारतात खेळवली गेली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली आणि दुसरा राऊंड युएईमध्ये खेळवला गेला. तसंच भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) युएईमध्येच खेळवला जाणार आहे. याआधी 2020 सालची आयपीएलही कोरोनामुळे युएईमध्ये झाली. यानंतर आता आयपीएल 2022 चं आयोजन कुठे होणार? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आयपीएल 2022 चं (IPL 2022) आयोजन भारतातच होईल, असं सांगितलं आहे.

'मला अपेक्षा आहे आयपीएलचं आयोजन भारतातच होईल. कारण ही स्थानिक स्पर्धा आहे. दुबई आणि भारतातल्या वातावरणात फरक आहे. भारतात खेळासाठी चाहते वेडे असतात. पुढच्या 7-8 महिन्यांमध्ये कोरोनाची स्थिती वेगळी असेल, त्यामुळे भरलेल्या स्टेडियममध्ये चाहत्यांना आयपीएल बघता येईल,' असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. आयपीएल 2022 च्या मोसमात आणखी दोन टीम वाढणार आहेत, त्यामुळे ही स्पर्धा 10 टीममध्ये खेळवली जाईल.

सौरव गांगुलीने टी-20 वर्ल्ड कपमधल्या टीम इंडियाच्या भवितव्यावरही भाष्य केलं. 'भारतीय टीममध्ये प्रतिभा आहे. त्यांच्याकडे रन करणारे आणि विकेट घेणारे खेळाडू उपलब्ध आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ते मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीमध्ये असले पाहिजेत. भारताने प्रत्येक मॅचवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मग पुढचा विचार केला पाहिजे. सुरूवातीपासूनच ट्रॉफी जिंकण्याचा विचार करू नये,' असा सल्ला गांगुलीने दिला.

आयपीएल 2021 मध्ये टी-20 क्रिकेटच्या हिशोबाने कमी स्कोअर झाला, पण याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचं गांगुली म्हणाला. दुबई आणि अबु धाबीमध्ये बॅटिंगसाठी चांगल्या खेळपट्ट्या असतील, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे.

First published:
top videos

    Tags: BCCI, Ipl, Sourav ganguly