मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /राशिद खानने आपल्या संघाशी असलेले 5 वर्षाचे जुने संबंध तोडले? रिलीज करताच दिली मोठी प्रतिक्रीया

राशिद खानने आपल्या संघाशी असलेले 5 वर्षाचे जुने संबंध तोडले? रिलीज करताच दिली मोठी प्रतिक्रीया

Rashid khan

Rashid khan

आयपीएल सीझन(IPL2022) 15 पूर्वी लेग स्पिनर राशिद खान (Rashid khan)ने सनराइजर्स हैदराबादशी जुने वर्षाचे जुने नाते तोडले आहे.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: क्रिकेट जगतात आता आयपीएल सीझन 15 चे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, आगामी मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) आठ टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये लेग स्पिनर राशिद खान (Rashid khan)चे नाव आहे. खरंतर राशिद आणि सनराइजर्स हैदराबाद (SRH) चे जुने नाते आहे. त्याला रिटेन न करता रिलीज केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, तो संघाशी असलेले 5 वर्षापूर्वीचे नाते तोडणार असल्याची चर्चा क्रिकेट स्तरावर रंगली आहे. याच कारणही तसेच आहे.

सनरायझर्स हैदराबाद हा एकमेव संघ आहे ज्यासाठी राशिद खान आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळला आहे. हे नाते 2017 मध्ये सुरू झाले आणि 5 वर्षे टिकले. मग अफगाणिस्तानच्या या सर्वाधिक कमाई करणार्‍या क्रिकेटपटूने 5 वर्षात 40 कोटी पगार देणारी फ्रँचायझी का सोडली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 2017 मध्ये रशीदचा पगार 4 कोटी रुपये होता आणि 2018 मध्ये फ्रँचायझीने तो 9 कोटी रुपये केला आणि या वर्षापर्यंत त्याला तेवढाच पगार मिळाला आहे.

दरम्यान, राशिद खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चार फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबाद आणि संघाच्या चाहत्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत.

राशीद खानची इमोशनल पोस्ट

राशिद खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, "सनरायझर्स हैदराबादसोबतचा प्रवास खूप छान होता. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम आणि विश्वास दाखवला. ऑरेंज आर्मी नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे आणि यासाठी मी नेहमीच आभारी राहीन. सर्व चाहते. मी आभारी राहीन."

View this post on Instagram

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

त्याचे हे आभार प्रदर्शन पाहता क्रिकेट जगतात तो त्याचे संघाशी असलेले 5 वर्षाचे जुने नाते तोडणा असल्याची चर्चा रंगली आहे.

2017 पासून तो राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याची आयपीएलमधील आकडेवारी जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमधील 76 सामन्यांत 6.33 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 93 बळी घेतले आहेत.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction