अबु धाबी, 1 डिसेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यामध्ये 27 खेळाडूंचा समावेश आहे, पण अनेक बड्या खेळाडूंना कोणत्याच टीमने रिटेन केलेलं नाही. हे खेळाडू आयपीएलच्या नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद यांच्याशी जोडले जाऊ शकतात. तसंच ज्या खेळाडूंना या टीमही घेणार नाहीत, ते लिलावात उतरतील. विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीने फक्त 3 खेळाडूंनाच रिटेन केलं आहे. यामध्ये स्वत: विराट, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. आरसीबीने ज्या खेळाडूला रिटेन केलं नाही, त्याने 24 तासांमध्येच धमाका केला आहे.
अबु धाबीमध्ये सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये (Abu dhabi T10) श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदु हसरंगाने (Wanindu Hasaranga) 10 बॉलमध्येच 5 विकेट घेतल्या आहेत. एवढच नाही तर त्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 8 रन दिले. पहिल्या दोन बॉलवर हसरंगाला विकेट मिळाली नव्हती. श्रीलंकेच्या या बॉलरने टी10 लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 10 सामन्यांमध्ये त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. एवढच नाही तर त्याचा इकोनॉमी रेटही 9 पेक्षा कमी आहे. आयपीएल 2021 मध्ये हसरंगा आरसीबीकडून खेळला, पण त्याला टीमने रिटेन केला नाही.
आयपीएलची सगळ्यात धक्कादायक यादी, 19 भारतीयांना बाहेरचा रस्ता, पाहा संपूर्ण लिस्ट
डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या हसरंगाने पहिल्या 2 बॉलवर 6 रन दिले. बांगला टायगर्सचा करीम जन्नत पहिल्या बॉलवर एकही रन करू शकला नाही, यानंतर दुसऱ्या बॉलला त्याने सिक्स मारला. हसरंगाने तिसऱ्या बॉलवर करीमला आणि चौथ्या बॉलवर जॉनसन चार्ल्सला आऊट केलं. अखेरच्या 2 बॉलवर 2 रन आले, म्हणजेच त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन दिले.
IPL Retention Full List : कोहली, धोनी रोहितसह 27 खेळाडू रिटेन, पाहा संपूर्ण यादी
24 वर्षांच्या हसरंगाने पुढच्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही आणि 3 विकेट मिळवल्या. पहिल्या बॉलवर बेनी हॉवेल आणि दुसऱ्या बॉलवर जेम्स फॉकनर आऊट झाला. पुढच्या तीन बॉलवर विष्णू सुकुमारनला एकही रन करता आली नाही, यानंतर अखेरच्या बॉलवर तो आऊट झाला, त्यामुळे ही ओव्हर मेडन झाली. वानिंदु हसरंगाची हॅट्रिक 2 ओव्हरमध्ये दोनदा हुकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, RCB