Home /News /sport /

IPL 2022 : लिलावात 'अनसोल्ड' राहिलेला David Miller ठरला सगळ्यात मोठा मॅच विनर, गुजरातला पोहोचवलं फायनलमध्ये!

IPL 2022 : लिलावात 'अनसोल्ड' राहिलेला David Miller ठरला सगळ्यात मोठा मॅच विनर, गुजरातला पोहोचवलं फायनलमध्ये!

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आपली पहिलीच आयपीएल (IPL 2022) खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या प्ले-ऑफमध्ये गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेटने पराभव केला. डेव्हिड मिलर (David Miller) गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे : आपली पहिलीच आयपीएल (IPL 2022) खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या प्ले-ऑफमध्ये गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेटने पराभव केला. डेव्हिड मिलर (David Miller)  गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मिलरने 38 बॉलमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली, त्यामुळे मिलरला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आयपीएल लिलावामध्ये डेव्हिड मिलर सुरूवातीला अनसोल्ड राहिला होता. दुसऱ्या राऊंडमध्ये जेव्हा मिलरचं नाव आलं तेव्हा एक कोटी रुपये बेस प्राईज असलेल्या मिलरला विकत घेण्यासाठी जोरदार बोली लागली. मिलरसाठी राजस्थान आणि गुजरात यांच्यात स्पर्धा सुरू होती. राजस्थानने मिलरवर पहिली बोली लावली, यानंतर गुजरातने 16वी बोली लावून त्याला 3 कोटी रुपयांना विकत घेतलं. मिलरची सावध सुरूवात क्वालिफायर-1 मध्ये राजस्थानविरुद्ध मिलरने सावध सुरूवात केली. पहिल्या 14 बॉलमध्ये त्याने फक्त 10 रन केले, कारण गुजरातने 85 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या. पहिल्या 14 बॉलनंतर मात्र मिलरने गाडी थेट शेवटच्या गियरमध्ये टाकली. पुढच्या 24 बॉलमध्ये त्याने 58 रन ठोकले, यात त्याने 5 सिक्स मारले, ज्यात विजयी सिक्सचाही समावेश होता. मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 188 रन केले. जॉस बटलरने 56 बॉलमध्ये 89 आणि संजू सॅमसनने 26 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली. गुजरातने या आव्हानाचा पाठलाग 3 विकेट गमावून केला. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 16 रनची गरज होती, तेव्हा मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या तिन्ही बॉलना सिक्स मारून गुजरातला विजय मिळवून दिला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या