Home /News /sport /

IPL 2022 : आयपीएल टीम्सचा मुंबई इंडियन्सबद्दल आक्षेप, रोहितने दिलं सणसणीत प्रत्युत्तर

IPL 2022 : आयपीएल टीम्सचा मुंबई इंडियन्सबद्दल आक्षेप, रोहितने दिलं सणसणीत प्रत्युत्तर

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 ला (IPL 2022) शनिवारपासून सुरूवात झाली आहे. आयपीएल टीमनी मुंबई इंडियन्सबाबत (Mumbai Indians) घेतलेल्या आक्षेपाबाबत रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली आहे, याचसोबत रोहितने आयपीएल टीमची बोलती बंद केली आहे.

    मुंबई, 29 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) शनिवारपासून सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरस आणि बायो-बबलच्या कठोर नियमांमुळे यंदा प्रवास टाळण्यासाठी लीग स्टेजच्या मॅच मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. आयपीएलच्या लीग स्टेजचे 70 सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत सामने होत असल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला होम ग्राऊंडचा फायदा मिळेल, तसंच स्टेडियममध्ये येणारे चाहतेही मुंबईच्या टीमलाच पाठिंबा देतील, असा आक्षेप आयपीएलच्या काही टीमनी घेतला होता. आयपीएल टीमनी घेतलेल्या या आक्षेपावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली आहे. 'अनेक टीमनी मुंबई मुंबईमध्ये कशी खेळू शकते, असं म्हणत आक्षेप घेतले, मग त्यांनी त्यांच्या शहरामध्ये 3-4 स्टेडियम उभारावी,' असं सणसणीत प्रत्युत्तर रोहित शर्माने दिलं आहे. रोहित शर्माच्या या भन्नाट उत्तराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 युएईमध्ये खेळवली गेली, तर आयपीएल 2021 ला भारतात सुरूवात झाली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर आयपीएलचा दुसरा राऊंड पुन्हा युएईमध्ये खेळवला गेला. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर यंदा बीसीसीआयने विमान प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मुंबई-पुण्यात आयपीएलचं आयोजन होत आहे. मुंबईच्या वानखेडे (Wankhede Stadium) आणि नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील (DY Patil Stadium) स्टेडियमवर प्रत्येकी 20-20 मॅच तर पुण्याच्या एमसीए (MCA Stadium Pune) आणि मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brebourne Stadium) प्रत्येकी 15-15 मॅच होतील. आयपीएलच्या सगळ्या 10 टीम वानखेडे आणि डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये प्रत्येकी 4-4 तर ब्रेबॉर्न आणि पुण्यात प्रत्येकी 3-3 मॅच खेळणार आहेत. आयपीएल प्ले-ऑफ आणि फायनल या 4 मॅचची ठिकाणं अजून निश्चित करण्यात आलेली नाहीत. मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मागच्या वर्षी मात्र मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2021 मध्ये टीमला प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नव्हता, यानंतर लिलावामध्ये मुंबईने टीममध्ये बरेच बदल केले. या मोसमाच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही मॅच झाली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या