• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल, 4 खेळाडू रिटेन करता येणार पण... BCCI ची घोषणा

IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल, 4 खेळाडू रिटेन करता येणार पण... BCCI ची घोषणा

आयपीएलच्या दोन नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर आता बीसीसीआयने (BCCI) पुढच्या मोसमाआधी (IPL 2022) खेळाडूंना कायम करण्याबाबत म्हणजेच रिटेन ठेवण्याबाबतच्या नियमांची घोषणा केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑक्टोबर : आयपीएलच्या दोन नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर आता बीसीसीआयने (BCCI) पुढच्या मोसमाआधी (IPL 2022) खेळाडूंना कायम करण्याबाबत म्हणजेच रिटेन ठेवण्याबाबतच्या नियमांची घोषणा केली आहे. आयपीएलच्या जुन्या 8 टीम प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करू शकतात, तर नव्या टीमना लिलावाआधी प्रत्येकी 3 खेळाडू विकत घेता येणार आहेत. बीसीसीआयने शनिवारी प्रत्येक टीमच्या फ्रॅन्चायजींना याबाबतचा मेल पाठवला आहे. तसंच 2022 च्या लिलावामध्ये 90 कोटी रुपयांची सॅलरी कॅप ठेवण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक टीम खेळाडू विकत घेण्यासाठी (IPL Auction 2022) जास्तीत जास्त 90 कोटी रुपयांपर्यंत खर्च करू शकते. सध्याच्या 8 टीमना 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला द्यावी लागणार आहे. यानंतर दोन नव्या टीम 1 डिसेंबर 2021 ते 25 डिसेंबर 2021 पर्यंत खेळाडूंना थेट विकत घेऊ शकते. रिटेन खेळाडूंना मिळणार इतके पैसे जर एखाद्या टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागतील. एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील. दोन खेळाडू कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी तसंच एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जुन्या टीमना 4 खेळाडू रिटेन करता येणार असले तरी यात तीनपेक्षा जास्त भारतीय खेळाडू असता कामा नये, तसंच कोणतीही टीम दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू रिटेन करू शकत नाही. याशिवाय टीमना दोनपेक्षा जास्त अनकॅप खेळाडूही रिटेन करता येणार नाहीत. दुसरीकडे नवीन टीम लिलावाआधी फक्त एकच परदेशी खेळाडू विकत घेऊ शकते. तसंच नव्या टीमला अनकॅप खेळाडू (एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला खेळाडू) विकत घ्यायचा असेल तर तोदेखील एकच घेता येणार आहे. सॅलरी कॅप टीमने जर 4 खेळाडू रिटेन केले तर त्यांना 42 कोटी रुपये मोजावे लागतील, त्यामुळे लिलावात जाताना टीमचे 90 कोटींपैकी 42 कोटी रुपये आधीच संपलेले असतील. 4 खेळाडूंना रिटेन केल्यानंतर लिलावात टीमला 48 कोटी रुपयांमध्ये उरलेले खेळाडू विकत घ्यावे लागतील. तसंच तीन खेळाडू कायम ठेवले तर 33 कोटी रुपये, दोन खेळाडू ठेवले तर 24 कोटी आणि एक खेळाडू कायम ठेवला तर 14 कोटी रुपये टीमच्या 90 कोटी रुपयांमधून कमी होतील. कोणते खेळाडू बाहेर पडणार? माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन राहिलेली मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह या तिघांना रिटेन करेल, तसंच चौथ्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा असेल. मुंबईने जर हा निर्णय घेतला तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना दोन नव्या टीम थेट विकत घेतील किंवा त्यांना लिलावात उतरावं लागेल. याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि डेव्हिड वॉर्नर हे खेळाडूदेखील त्यांच्या सध्याच्या टीमसोबत राहणार नसल्याचं वृत्त आहे. डेव्हिड वॉर्नरने स्वत:च याची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला नेतृत्व दिल्यानंतर आता पुढच्या मोसमात श्रेयस अय्यर दुसऱ्या टीमचा कॅप्टन होण्यासाठी बाहेर पडू शकतो. यावर्षी दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यरला सुरुवातीची आयपीएल मुकावी लागली होती, त्यामुळे ऋषभ पंतकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं.
  Published by:Shreyas
  First published: