• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022 Auction : आयपीएलच्या दोन टीमचा सस्पेन्स लवकरच संपणार, 'धोनी'च्या एण्ट्रीमुळे नवा ट्विस्ट

IPL 2022 Auction : आयपीएलच्या दोन टीमचा सस्पेन्स लवकरच संपणार, 'धोनी'च्या एण्ट्रीमुळे नवा ट्विस्ट

आयपीएल 2022 (IPL 2022 Auction) च्या मोसमात दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. यासाठीची लिलाव प्रक्रिया दुबईच्या ताज हॉटेलमध्ये सुरू झाली आहे.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएल 2022 (IPL 2022 Auction) च्या मोसमात दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. यासाठीची लिलाव प्रक्रिया दुबईच्या ताज हॉटेलमध्ये सुरू झाली आहे. पुढच्या काही तासांमध्ये या दोन नव्या टीमची घोषणा करण्यात येईल. प्रसिद्ध फूटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे (Manchester United) मालकही या लिलावात सहभागी झाले आहेत. क्रिकबझने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा शहरांपैकी दोन शहरांच्या टीम आयपीएलच्या पुढच्या मोसमात खेळतील. अडानी ग्रुप (Adani Group) आणि संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपही (RPSG Group) लिलावात सहभागी झाला आहे. याशिवाय कोटक ग्रुपनेही लिलावाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या बड्या उद्योगपतींनी आयपीएल टीम विकत घेण्यात रस दाखवला असला तरी यामध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) एण्ट्रीमुळे नवा ट्वीस्ट पाहायला मिळाला. एमएस धोनीचा मॅनेजर असलेल्या अरुण पांडे यांच्या रिठी स्पोर्ट्स या कंपनीने उद्योगपती आनंद पोदार यांच्या कंपनीसाठी कटकची टीम विकत घेण्यात रस दाखवला, पण बिडिंग करण्यासाठी रिठी स्पोर्ट्सला उशीर झाला, त्यामुळे त्यांचं टेंडर स्वीकारण्यात आलं नाही, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे. अरबिंदो फार्मा ही कंपनी लखनऊच्या टीमसाठी आग्रही आहे. अरबिंदो फार्मा या कंपनीला संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपकडून आव्हान मिळत आहे, कारण या कंपनीलाही लखनऊच्या टीममध्ये रस आहे. अहमदाबादच्या टीमसाठी अडानी ग्रुप आणि टोरेंट फार्मा यांच्यात स्पर्धा आहे. टीम विकत घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सगळ्यांना दोन एनव्हलप सबमिट करायला सांगण्यात आलं आहे. यातल्या पहिल्या एनव्हलपमध्ये आर्थिक कागदपत्र तर दुसऱ्या एनव्हलपमध्ये बिडिंगची कागदपत्र द्यावी लागणार आहेत. आर्थिक कागदपत्र नीट असतील तरच दुसरं एनव्हलप उघडण्यात येईल.
  Published by:Shreyas
  First published: