IPL मध्ये TATA ची एण्ट्री, चिनी कंपनीला दिल्ला धक्का
IPL मध्ये TATA ची एण्ट्री, चिनी कंपनीला दिल्ला धक्का
आयपीएल (IPL) बद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. व्हिव्हो (VIVO) या चायनिज मोबाईल कंपनीने टायटल स्पॉनरशीपमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याऐवजी आता टाटा ग्रुप (Tata Group) पुढच्या वर्षीपासून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर असेल.
मुंबई, 11 जानेवारी : आयपीएल (IPL) बद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. व्हिव्हो (VIVO) या चायनिज मोबाईल कंपनीने टायटल स्पॉनरशीपमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याऐवजी आता टाटा ग्रुप (Tata Group) पुढच्या वर्षीपासून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर असेल. आयपीएल चेयरमन ब्रजेश पटेल यांनी पीटीआयला याबाबत माहिती दिली. मंगळवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीमध्ये टाटा ग्रुपला आयपीएल टायटल स्पॉन्सर करण्यात आलं.
VIVO ने 2018 साली आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपचे अधिकार मिळवले होते. यातून कंपनी बीसीसीआयला प्रत्येक वर्षी 440 कोटी रुपये द्यायची. व्हिव्होचा हा करार 2022 पर्यंत होता, पण भारत-चीन यांच्यातला वाद वाढल्यानंतर चीनच्या मोबाईल कंपन्यांना विरोध वाढला, यानंतर व्हिव्होने एक वर्ष टायटल स्पॉनरशीपमधून माघार घेतली, तेव्हाच हे डील आता पुढे वाढणार नाही, हे स्पष्ट झालं होतं.
TATA to replace VIVO as IPL title sponsor next year: IPL Chairman Brijesh Patel to ANI pic.twitter.com/n0NVLTqjjG
आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की 'आम्ही टाटाला टायटल स्पॉन्सर म्हणून पाहत होतो, जेव्हापासून व्हिव्होने बीसीसीआयसोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला. कराराची दोन वर्ष शिल्लक होती, त्यामुळे टाटा आता उरलेल्या काळासाठी आयपीएल टायटल स्पॉन्सर असेल'.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.