मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सना सुरूवातीलाच धक्का, 8 कोटींचा हुकमी एक्का बाहेर!

IPL 2022 : मुंबई इंडियन्सना सुरूवातीलाच धक्का, 8 कोटींचा हुकमी एक्का बाहेर!

पाचवेळा आयपीएल चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सनना (Mumbai Indians) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पहिल्या सामन्याआधीच धक्का लागला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 15 मार्च : पाचवेळा आयपीएल चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सनना (Mumbai Indians) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पहिल्या सामन्याआधीच धक्का लागला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव दुखापतीतून (Suryakumar Yadav injury) अजूनही सावरलेला नाही, त्यामुळे तो सुरूवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजआधी सूर्यकुमार यादवच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो या सीरिजमध्येही खेळू शकला नव्हता. मुंबई इंडियन्सना पहिला सामना 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) होणार आहे.

मुंबई इंडियन्सने लिलावाआधी रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) सूर्यकुमार यादवला रिटेन केलं होतं. यासाठी मुंबईने सूर्याला 8 कोटी रुपये दिले. वेस्ट इंडिजविरुद्ध मागच्या महिन्यात झालेल्या सीरिजमध्ये सूर्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तो सध्या बँगलोरच्या एनसीएमध्ये (NCA) रिहॅबमधून जात आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार बोर्डाची मेडिकल टीम त्याला ओपनिंगला खेळण्याचा धोका न पत्करण्याचा सल्ला देईल. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या इशान किशननंतर (Ishan Kishan) सूर्यकुमार यादव मुंबईचा महत्त्वाचा बॅटर आहे. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यांमध्ये 5 दिवसांचं अंतर आहे. मुंबईची दुसरी मॅच 2 एप्रिलला राजस्थानविरुद्ध होणार आहे. या मॅचपर्यंत सूर्या फिट होईल, अशी शक्यता आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav