मुंबई, 1 मे: आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक मनोरंजक दृश्ये पाहायला मिळतात. मुंबई इंडियन्सचा(mumbai Indians) संघ खेळत असेल तर नक्कीच काहीतरी मनोरंजक पाहायला मिळेल. संघाचा दिग्गज खेळाडू कियारन पोलार्ड अनेकदा काही ना काही करताना दिसतो. पण यावेळी सूर्यकुमार यादवचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सूर्यकुमारने खास प्रसंगी युझवेंद्र चहलला मिठी मारली आणि काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. दुसरीकडे, चहल या डावातील 8 वे षटक करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने सूर्यकुमारला बाद करण्याचे आवाहन केले. तो बऱ्यापैकी आत्मविश्वासू दिसत होता. मात्र निर्णय सूर्यकुमारच्या बाजूने लागल्याने चहलची निराशा झाली. ते पाहून सूर्यकुमारने त्याला मिठी मारली आणि काही वेळ पाहतच राहिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
— Patidarfan (@patidarfan) April 30, 2022
चहल आणि यादव यांच्या जादुई झप्पीचा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
नेमकं काय झालं?
ही घटना सामन्याच्या 8व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला त्याच्या फिरकीत जवळपास अडकवलं होतं. चहलचा बॉल यादवच्या पॅडवर लागला होता. या घटनेनंतर चहलने अपील केलं. अंपयारने नॉटआऊट दिल्यानंतर चहलने विलंब न लावता डीआरएस घेतला.
जिथे रोहित शर्मा सोडून गेला...; पहिल्या विजयनानंतर Suryakumar Yadav चं मोठं वक्तव्य
यानंतर थर्ड अंपायरच्या निर्णयाने युझवेंद्र चहल निराश झाला कारण त्यांचा निर्णय फलंदाजाच्या बाजूने गेला. त्याचवेळी थर्ड अंपायरच्या या निर्णयावर चहल चांगलाच संतापला होता. तर, त्याला नाबाद फलंदाज सूर्यकुमार यादवने मिठी मारली. यानंतर चहल लगेच शांतंही झाला.
How was that? pic.twitter.com/7hFJvXX6KV
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 30, 2022
मुंबईने आयपीएलच्या 15 व्या सिझनमधीस (IPL 2022) पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मात केली आहे. डॅनियल सॅम्सने विजयी सिक्स मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचं आव्हान मुंबईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
मुंबईनं राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. सलग आठ पराभवानंतर मुंबईला रोहितच्या वाढदिवशी या सिझनमधील पहिलं यश मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav, Yuzvendra Chahal