Home /News /sport /

IPL मध्ये फक्त एका बॉलरने कमावले 100 कोटी, तोही भारतीय नाही, टॉप-5 मध्ये 2 स्पिनर

IPL मध्ये फक्त एका बॉलरने कमावले 100 कोटी, तोही भारतीय नाही, टॉप-5 मध्ये 2 स्पिनर

आयपीएल 2022 (IPL 2022) साठीच्या तयारीला बीसीसीआयने (BCCI) सुरुवात केली आहे. यावेळी 8 ऐवजी 10 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम यंदाच्या आयपीएलमध्ये दिसतील.

    मुंबई, 11 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) साठीच्या तयारीला बीसीसीआयने (BCCI) सुरुवात केली आहे. यावेळी 8 ऐवजी 10 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम यंदाच्या आयपीएलमध्ये दिसतील. केएल राहुल (KL Rahul) लखनऊचा तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अहमदाबादचा कर्णधार होऊ शकतो. टीम वाढल्यामुळे आता मॅचची संख्याही वाढणार आहे. आयपीएल 2022 आधी फेब्रुवारी महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही 5 ट्रॉफी जिंकून सगळ्यात यशस्वी आयपीएल टीम आहे, तर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या 8 जुन्या टीमनी 27 खेळाडूंना रिटेन केलं, तर नव्या दोन टीम प्रत्येकी 3-3 खेळाडूंना टीममध्ये घेऊ शकतात. आयपीएलचा इतिहास बघितला तर फक्त एकाच खेळाडूला पगार म्हणून 100 कोटींपेक्षा जास्तची कमाई करता आली आहे. या खेळाडूचं नाव आहे सुनिल नारायण (Sunil Narine). वेस्ट इंडिजच्या या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्सनी (Kolkata Knight Riders) रिटेन केलं आहे. टी-20 मध्ये सुनिल नारायणने 400 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. 2012 पासून खेळतोय आयपीएल 33 वर्षांचा सुनिल नारायण 2012 पासून आयपीएल खेळत आहे. पहिल्या मोसमात त्याला जवळपास 3.5 कोटी रुपये मिळाले, यानंतर त्याची कामगिरी सुधारत गेली, ज्यामुळे त्याचा पगारही वाढला. 2018 ते 2021 दरम्यान त्याला प्रत्येक मोसमासाठी 12.5 कोटी रुपये देण्यात आले. मागच्या मोसमात त्याची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे या मोसमासाठी त्याला 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलं. पगार म्हणून नारायणला आतापर्यंत जवळपास 101 कोटी रुपये मिळाले आहेत. हरभजन दुसरा, भुवी तिसरा ऑफ स्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो आयपीएल खेळताना दिसणार नाही. बॉलर म्हणून सर्वाधिक पगार मिळवणाऱ्यांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमधून हरभजनने 58 कोटी रुपये कमावले आहेत. मागच्या मोसमात केकेआरने (KKR) त्याला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. याशिवाय तो मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे. फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) जवळपास 52 कोटी रुपये कमावले आहेत. मागच्या मोसमात तो हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळला आहे, यासाठी त्याला 8.5 कोटी रुपये मिळाले होते. 2009 सालापासून भुवी आयपीएल खेळत आहे. या मोसमात त्याला हैदराबादने रिटेन केलं नाही, त्यामुळे तो मेगा ऑक्शनमध्ये दिसेल. मलिंगा-स्टेनही करोडपती श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला, पण आता त्याने निवृत्ती घेतली. 2008 ते 2020 पर्यंत तो आयपीएलमध्ये खेळला. त्याला इतके वर्षांत पगार म्हणून जवळपास 48 कोटी रुपये मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर डेल स्टेनला (Dale Steyn) आयपीएलमधून 47 कोटी रुपये मिळाले. स्टेन आयपीएलमध्ये आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबादकडून खेळला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, KKR

    पुढील बातम्या