मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : वॉर्नर हिशोब चुकताच करत होता पण... आपल्याच खेळाडूने केला 'घात'

IPL 2022 : वॉर्नर हिशोब चुकताच करत होता पण... आपल्याच खेळाडूने केला 'घात'

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला (Delhi Capitals vs SRH) विजयासाठी 208 रनचं आव्हान दिलं आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) 58 बॉलमध्ये 92 रनवर आणि रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) 35 बॉलमध्ये 67 रनवर नाबाद राहिला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला (Delhi Capitals vs SRH) विजयासाठी 208 रनचं आव्हान दिलं आहे. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन याने टॉस जिंकून दिल्लीला पहिले बॅटिंगला बोलावलं यानंतर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 207/3 एवढा स्कोअर केला. डेव्हिड वॉर्नर (David Warner) 58 बॉलमध्ये 92 रनवर नाबाद राहिला. वॉर्नरने त्याच्या या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 12 फोर मारल्या. रोव्हमन पॉवेलने (Rovman Powell) 35 बॉलमध्ये नाबाद 67 रनची वादळी खेळी केली. पॉवेलने 6 सिक्स आणि 3 फोर ठोकले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट आणि श्रेयस गोपाळ यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

वॉर्नरने घेतला बदला पण

आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत वॉर्नर हैदराबादच्या टीमचा महत्त्वाचा भाग होता, एवढच नाही तर मागच्या वर्षी तो सुरूवातीला हैदराबादचा कर्णधार होता, पण अचानक त्याच्याकडून टीमचं नेतृत्व काढून केन विलियमसनला देण्यात आलं. यानंतर वॉर्नरला प्लेयिंग इलेव्हनमधूनही बाहेर बसवण्यात आलं. बाऊंड्री लाईनच्या बाहेर बसून रडतानाचा वॉर्नरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हैदराबादने केलेल्या या अपमानाचा बदला वॉर्नर घेणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. वॉर्नरने त्याचा हैदराबादसोबतचा हा हिशोब चुकताही केला, पण त्याचं शतक फक्त 8 रनने हुकलं. वॉर्नरचं शतक हुकायला दिल्लीचाच खेळाडू कारणीभूत ठरला.

19वी ओव्हर संपली तेव्हा वॉर्नर 92 रनवर नाबाद होता, पण रोव्हमन पॉवेलने शेवटच्या ओव्हरला वॉर्नरला स्ट्राईकच दिला नाही. पॉवेलने उमरान मलिकच्या ओव्हरचे सगळे 6 बॉल खेळले, या ओव्हरमध्ये पॉवेलने 18 रन काढले आणि शेवटच्या बॉलला बाईजची एक रन घेतली. मलिकच्या ओव्हरमध्ये पॉवेलने एक सिक्स आणि 3 फोर मारल्या.

पॉवेलची प्रतिक्रिया

इनिंग संपल्यानंतर पॉवेलला वॉर्नरच्या हुकलेल्या शतकाबाबत विचारण्यात आलं. वॉर्नरचं शतक व्हावं अशी माझीही इच्छा होती, पण त्यानेच मला जेवढे शॉट मारता येतील तेवढे मार असं सांगितलं. वॉर्नर स्वत:च त्याच्या शतकाबाबत चिंतेत नव्हता, असं पॉवेल म्हणाला.

First published:

Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022, SRH