Home /News /sport /

IPL 2022: शुभमन गिल झाला Emotional, व्हिडीओ शेअर करत KKR सोबतच्या जागवल्या आठवणी

IPL 2022: शुभमन गिल झाला Emotional, व्हिडीओ शेअर करत KKR सोबतच्या जागवल्या आठवणी

Shubman Gill

Shubman Gill

अहमदाबाद या नव्या आयपीएल संघासोबत करारबद्ध झाल्यानंतर शुबमन गिलने (Shubman Gill) संघातील सहकाऱ्यांसोबतचे काही क्षणांचा व्हिडीओ शेअर करत केकेआरमधील आठवणींना उजाळा दिला आहे.

  नवी दिल्ली, 24 जानेवारी: लखनऊ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील नवीन संघानी आगामी लिलावापूर्वी घेतलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अहमदाबाद संघाने हार्दिक पंड्या (Hardik Pandya), राशिद खान (Rashid Khan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) या त्रिमूर्ती’ची निवड केली. त्यामुळे त्यांना जून्या संघांना अलविदा कराव लागले. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) नात तुटल्याने शुबमन गिल इमोशनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत केकेआरसोबतच्या आठवणी जागवल्या. अहमदाबाद संघाने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं असून त्यांनी हार्दिक पंड्या आणि राशिद खान यांना प्रत्येकी 15-15 कोटी रुपये दिले आहेत. तर शुभमन गिल याला आठ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. दरम्यान, शुभमनने स्वत: केकेआरमधील आठवणींना उजाळा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. केकेआर एका स्वप्नासारखं अशी सुंदर कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये संघातील सहकाऱ्यांसोबतचे काही क्षण शेअर केले आहेत. स्विमिंग पुल वरील धमाल मस्ती, वाढदिवसाचे सेलिब्रेशन अशा अनेक संघासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचा हा इमोशनल व्हिडीओ सध्यो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
  गिलने आतापर्यंत 58 आयपीएल सामने खेळले असून 1 हजार 417 रन केले आहेत. 2019 मध्ये त्याला आयपीएल इमरजिंग प्लेयर ऑफ द इयरचा खिताबही मिळाला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ipl 2022, KKR

  पुढील बातम्या