मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) आणखी एक धक्का बसला आहे. टीमचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मॅच विनर खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताच्या स्नायूला दुखापत झाली आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. बीसीसीआयच्या मेडिकल टीमशी सल्लामसलत करून सूर्याला उरलेला संपूर्ण मोसम विश्रांतीची गरज आहे, असं मुंबई इंडियन्सने सांगितलं आहे. याआधी अंगठ्याच्या दुखापतीमुळेच सूर्यकुमार यादव या आयपीएलमधल्या पहिल्या दोन मॅचही खेळू शकला नव्हता.
सूर्यकुमार यादव आयपीएलच्या या मोसमात मुंबईचा सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू आहे. सूर्याने 8 मॅचच्या 8 इनिंगमध्ये 43.29 ची सरासरी आणि 145.67 च्या स्ट्राईक रेटने 303 रन केले, यात त्याने 3 अर्धशतकं केली.
Suryakumar Yadav has sustained a muscle strain on his left fore arm, and has been ruled out for the season. He has been advised rest, in consultation with the BCCI medical team. pic.twitter.com/78TMwPemeJ
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
आयपीएल 2022 मध्ये मुंबईने पहिल्या 8 मॅच गमावल्यानंतर राजस्थान आणि गुजरातविरुद्ध लागोपाठ 2 विजय मिळवले, पण खराब सुरूवातीमुळे मुंबई प्ले-ऑफच्या रेसमधून आधीच बाहेर झाली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता बॅटिंगचा खराब फॉर्म आणि बॉलर्सचा संघर्ष हे मुंबईच्या निराशाजनक कामगिरीचं प्रमुख कारण ठरलं. संपूर्ण आयपीएल बाहेर झाल्यामुळे आता सूर्यकुमार यादव मुंबईकडून थेट पुढच्याच मोसमात खेळताना दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav