मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : ज्याच्या बाऊन्सरने झाला टेस्ट क्रिकेटरचा मृत्यू, त्यालाच SRH ने दिली संधी

IPL 2022 : ज्याच्या बाऊन्सरने झाला टेस्ट क्रिकेटरचा मृत्यू, त्यालाच SRH ने दिली संधी

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Delhi Capitals vs SRH) होत आहे. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Delhi Capitals vs SRH) होत आहे. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि हैदराबादने या सामन्यासाठी टीममध्ये बरेच बदल केले आहेत. दिल्लीने चौघांना तर हैदराबादने तिघांना बाहेर केलं आहे.

दिल्लीने या सामन्यासाठी शॉ, अक्षर पटेल, मुस्तफिजूर आणि चेतन सकारिया यांना बाहेर केलं आहे, त्यांच्याऐवजी एनरिच नॉर्किया, मनदीप सिंग, रिपल पटेल आणि खलील अहमद यांना संधी दिली आहे. यापैकी अक्षर पटेल दुखापतीमुळे खेळू शकत नसल्याचं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने सांगितलं.

दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादने कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ आणि सीन एबॉट (Sean Abbott) यांना संधी दिली आहे. हे तिन्ही हैदराबादसाठी पदार्पण करत आहेत. वॉशिंग्टन सुंदरला मागच्या सामन्यात दुखापत झाली, तर नटराजनही दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये आणि मार्को जेनसनला हैदराबादने बाहेर केलं आहे.

सीन एबॉट 7 वर्षांनी आयपीएलमध्ये

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर सीन एबॉट 7 वर्षांनी आयपीएलमध्ये खेळत आहे. याआधी 2015 साली तो आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळला होता, पण 2015 साली खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

एबॉटच्या बाऊन्सरमुळे मृत्यू

सीन एबॉटच्या बाऊन्सरमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूज (Phil Huges) याचा मृत्यू झाला होता. 27 नोव्हेंबर 2014 साली ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये सीन एबॉटने फिल ह्यूजला बाऊन्सर टाकला, हा बाऊन्सर ह्यूजच्या डोक्यावर आदळला आणि तो मैदानातच कोसळला. यानंतर ह्यूजला रुग्णालयात नेण्यात आलं, तिकडेच त्याला मृत घोषित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातला हा काळ्या दिवसापैकी एक समजला जातो.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, SRH