मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 'जडेजाला सपोर्ट नाही, इगोने CSK ला डुबवलं', चॅम्पियन खेळाडूने सांगितली Inside Story

IPL 2022 : 'जडेजाला सपोर्ट नाही, इगोने CSK ला डुबवलं', चॅम्पियन खेळाडूने सांगितली Inside Story

Photo-CSK/Twitter

Photo-CSK/Twitter

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरूवात अत्यंत खराब झाली. एमएस धोनीने (MS Dhoni) स्पर्धा सुरू व्हायच्या दोन दिवस आधी टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) नेतृत्व देण्यात आलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरूवात अत्यंत खराब झाली. एमएस धोनीने (MS Dhoni) स्पर्धा सुरू व्हायच्या दोन दिवस आधी टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) नेतृत्व देण्यात आलं, पण स्वत: जडेजा आणि टीमची कामगिरी निराशाजनक झाली. सीएसकेने सुरूवातीच्या 8 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या, त्यामुळे पुन्हा एकदा धोनीला टीमचं कर्णधार करण्यात आलं.

धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच सामन्यात सीएसकेचा विजय झाला. चेन्नईच्या टीममध्ये सुरू असलेल्या या घटनांबाबत 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे खेळाडू सय्यद किरमाणी (Sayed Kirmani) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज तक सोबत बोलत होते. 'जडेजाला पूर्ण पाठिंबा मिळाला नाही. टीममध्ये धोनी असताना जडेजाला कर्णधार करण्यात आलं, त्यामुळे टीममध्ये ईर्ष्येची भावना निर्माण झाली, ज्यामुळे टीमचं जहाज बुडलं,' असं किरमाणी म्हणाले.

'प्रत्येकाचा विचार असतो, युवा आणि नव्या खेळाडूला कर्णधारपद सोपवावं, असा विचार धोनीने केला असेल. जडेजा उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, पण धोनीसोबत असतानाही त्याला कर्णधारपदाचा दबाव झेलता आला नाही, सीएसकेनेही या मोसमात चांगली कामगिरी केली नाही. आयपीएलमधली ही चॅम्पियन टीम होती, त्यामुळे जडेजाने विचार केला असेल, माझ्यामुळे टीमची कामगिरी चांगली होत नाही, म्हणूनच त्याने धोनीला पुन्हा कॅप्टन्सी दिली असेल,' अशी प्रतिक्रिया किरमाणी यांनी दिली.

'चांगली कामगिरी करता येत नसल्यामुळे कर्णधारपद सोडणं यात काहीच लाजिरवाणं नाही. हा एक टीम गेम आहे, त्यामुळे टीम एफर्ट महत्त्वाचा असतो. कर्णधार चांगली कामगिरी करत नसेल, तर याचा फटका टीमलाही बसतो. याच कारणामुळे विराटही कर्णधारपदावरून बाजूला झाला. मागच्या 2-3 वर्षांमध्ये त्याची कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. प्रत्येक खेळाडूचा हा वैयक्तिक निर्णय असतो. आपली कामगिरी ठिक होत नाही आणि याचा फटका टीमला बसतोय, असं कर्णधाराला वाटलं तर तो कर्णधारपद सोडतो. धोनीसारखा लायक कर्णधार आजपर्यंत भारतात झालेला नाही, त्याच्या जवळही कोणी येऊ शकत नाही,' असं किरमाणी म्हणाले.

'कोणत्याही टीममध्ये इगोची समस्या असते, जगभरातल्या समस्या यामुळेच आहेत. धोनीला सोबत ठेवून जडेजाला कर्णधार करण्यात आलं, यामुळे अहंकाराची भावना निर्माण झाली. इथूनच पुढे सगळ्या गोष्टी घडल्या आणि टीम योग्य खेळली नाही,' असा दावाही किरमाणी यांनी केला.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Ravindra jadeja