Home /News /sport /

IPL 2022 : चहलच्या हॅट्रिकमुळे KKR गारद, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 4 विकेट, VIDEO

IPL 2022 : चहलच्या हॅट्रिकमुळे KKR गारद, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 4 विकेट, VIDEO

आयपीएल 2022 ची (IPL 2022) पहिली हॅट्रिक राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal Hattrick) नावावर झाली आहे. केकेआरविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात चहलने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या.

    मुंबई, 19 एप्रिल : आयपीएल 2022 ची (IPL 2022) पहिली हॅट्रिक राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal Hattrick) नावावर झाली आहे. केकेआरविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात चहलने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या, या कामगिरीमुळे राजस्थानने कोलकात्यावर थरारक विजय मिळवला. चहलने 17 व्या ओव्हरमध्ये केकेआरच्या 4 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला चहलने व्यंकटेश अय्यरला 6 रनवर माघारी पाठवलं. यानंतर चहलने ओव्हरच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलला विकेट घेतल हॅट्रिक पूर्ण केली. त्याने श्रेयस अय्यरला 85 रनवर, शिवम मावीला शून्य आणि पॅट कमिन्सला शून्य रनवर आऊट केलं. चहलने 4 ओव्हरमध्ये 40 रन देऊन 5 विकेट घेतल्या. आयपीएलमधली चहलची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. राजस्थानची पाचवी हॅट्रिक युझवेंद्र चहल राजस्थानकडून हॅट्रिक घेणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी अजित चंडिला, प्रविण तांबे, शेन वॉटसन आणि श्रेयस गोपाळ यांनी राजस्थानकडून खेळताना हॅट्रिक घेतली आहे. चहलकडे पर्पल कॅप केकेआरविरुद्ध 5 विकेट घेत युझवेंद्र चहलने पर्पल कॅपही मिळवली आहे. आयपीएल मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप देण्यात येते. चहलने 6 मॅचमध्ये 10.35 ची सरासरी आणि 7.33 च्या इकोनॉमी रेटने 17 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या