Home /News /sport /

IPL 2022 : बटलरच्या वादळाचा आता KKR ला तडाखा, ठोकलं सिझनचं दुसरं शतक

IPL 2022 : बटलरच्या वादळाचा आता KKR ला तडाखा, ठोकलं सिझनचं दुसरं शतक

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जॉस बटलरने (Jos Buttler) मोसमातलं दुसरं शतक ठोकलं आहे. केकेआरविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात बटलरने 61 बॉलमध्ये 103 रन केले.

    मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जॉस बटलरने (Jos Buttler) मोसमातलं दुसरं शतक ठोकलं आहे. केकेआरविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात बटलरने 61 बॉलमध्ये 103 रन केले, यात 9 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. केकेआरविरुद्धच्या मॅचआधी बटलरने मुंबईविरुद्धही शतक केलं होतं. मुंबईविरुद्ध बटलरने 68 बॉलमध्ये 100 रनची खेळी केली, यात त्याने 11 फोर आणि 5 सिक्स मारल्या. बटलरने 147.06 च्या स्ट्राईक रेटने रन केले. आयपीएल 2022 च्या मोसमात सर्वाधिक रन केल्याबद्दलची ऑरेंज कॅप सध्या बटलरकडे आहे. बटलरने यंदा खेळलेल्या 6 मॅचमध्ये 375 रन केल्या आहेत. जॉस बटलरच्या या तुफानी खेळीमुळे राजस्थानने या मोसमातल्या सर्वाधिक स्कोअरची नोंद केली आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 217/5 पर्यंत मजल मारली. बटलरच्या शतकाशिवाय कर्णधार संजू सॅमसनने 19 बॉलमध्ये 38 आणि शिमरोन हेटमायरने 13 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. कोलकात्याकडून सुनिल नारायणला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. शिवम मावी, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. केकेआरविरुद्धच्या या सामन्यात राजस्थानला मोठा विजय मिळाला तर ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचतील. राजस्थानने 5 पैकी 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे केकेआरने 3 मॅच जिंकल्या आणि 3 हरल्या. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान पाचव्या आणि केकेआर सहाव्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या