Home /News /sport /

IPL 2022 : चहलची हॅट्रिक, बटलरचं शतक, राजस्थानचा KKR वर रोमांचक विजय

IPL 2022 : चहलची हॅट्रिक, बटलरचं शतक, राजस्थानचा KKR वर रोमांचक विजय

Photo-IPL

Photo-IPL

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे.

    मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर (Rajasthan Royals vs KKR) 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. राजस्थानने दिलेलं 218 रनचं आव्हान पार करताना कोलकात्याचा 19.4 ओव्हरमध्ये 210 रनवर ऑल आऊट झाला. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) या सामन्यात हॅट्रिक घेतली. यंदाच्या आयपीएल मोसमातली ही पहिलीच हॅट्रिक आहे. चहलने 17 व्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या. 17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला चहलने व्यंकटेश अय्यरला 6 रनवर माघारी पाठवलं. यानंतर चहलने ओव्हरच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलला विकेट घेतल हॅट्रिक पूर्ण केली. त्याने श्रेयस अय्यरला 85 रनवर, शिवम मावीला शून्य आणि पॅट कमिन्सला शून्य रनवर आऊट केलं. चहलने 4 ओव्हरमध्ये 40 रन देऊन 5 विकेट घेतल्या. आयपीएलमधली चहलची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. चहलने हॅट्रिक घेतल्यानंतरही उमेश यादवने (Umesh Yadav) पुढच्याच ओव्हरला राजस्थानवर आक्रमण केलं. बोल्टने टाकलेल्या 18व्या ओव्हरमध्ये उमेश यादवने 2 सिक्स आणि 1 फोर मारली, ज्यामुळे केकेआरने या ओव्हरमध्ये 20 रन ठोकल्या. यानंतर केकेआरला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 18 रनची गरज होती, पण प्रसिद्ध कृष्णाने 19व्या ओव्हरमध्ये 7 रन दिल्या, त्यामुळे केकेआरला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 रन हवे होते. आपली पहिलीच आयपीएल मॅच खेळणाऱ्या ओबेड मकॉयने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेत राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर जॉस बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकामुळे राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 217 रन केले. बटलरने 61 बॉलमध्ये 103 रनची आक्रमक खेळी केली, यात त्याने 5 सिक्स आणि 9 फोर ठोकले. केकेआरविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. राजस्थानचा 6 पैकी 4 मॅचमध्ये विजय आणि 2 मॅचमध्ये पराभव झाला. केकेआरने 7 पैकी 3 मॅच जिंकल्या तर 4 मॅचमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर सहाव्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या