मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: तीन सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर रोवमन पॉवेलने चक्क आपल्या बॅटलाच दिली धमकी! पुढे काय झालं वाचा

IPL 2022: तीन सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर रोवमन पॉवेलने चक्क आपल्या बॅटलाच दिली धमकी! पुढे काय झालं वाचा

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज रोव्हमन पॉवेल (rovman powell) म्हणतो की तो त्याच्या बॅटशी बोलतो. पहिल्या तीन सामन्यांत तो आपल्या संघासाठी धावा करू शकला नाही. तेव्हा त्याने आपल्या बॅटला धमाकावलं होतं. गेल्या सामन्यात पॉवेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 67 धावा केल्या होत्या.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 9 मे : सनरायझर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज रोव्हमन पॉवेलने (rovman powell) दमदार फलंदाजी केली. वेस्ट इंडिजच्या या होतकरू क्रिकेटपटूने आयपीएल 2022 मध्ये पहिले अर्धशतक झळकावलं. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 35 चेंडूत 67 धावांची जलद खेळी खेळली. त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसोबत चौथ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे दिल्लीने 207 धावा केल्या. या सामन्यात पॉवेल इतका यशस्वी कसा ठरला, याचा खुलासा त्यानेच केला आहे. सलग तीन सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर त्याने आपल्या बॅटला धमकावलं असल्याचे त्याचं म्हणणं आहे.

द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्टमध्ये, तो आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल बोलला आणि म्हणाला, "तो त्याच्या बॅटशी संवाद साधतो. रोव्हमन पॉवेलच्या मते, आयपीएलच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये मी जास्त धावा करू शकलो नाही. मी माझ्या खोलीत होतो. मी माझी बॅट बेडवर ठेवली आणि म्हणालो, तू मला आयपीएलमध्ये निराश करणार आहेस का? तू काय करतेयस."

मी तुला आणखी एक संधी देतो

तो पुढे पॉडकास्टमध्ये म्हणाला, 'ठीक आहे, मी पुढचा सामना खेळणार आहे आणि तुला आणखी एक संधी देणार आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मला एक चेंडू खेळायला मिळाला. मी माझ्या खोलीत गेलो. मी माझ्या पलंगावर बॅट ठेवली आणि म्हणालो, मी तुला ब्रेक देणार आहे. मग मी 4-5 बॅट्स पाहिल्या आणि माझ्यासाठी कोण धावा करेल असे विचारले.

IPL 2022 : ऋषभ पंतमुळे झाला दिल्ली कॅपिटल्सचा पराभव! रिकी पॉन्टिंगनं दिलं स्पष्टीकरण...

आयपीएल 2022 मध्ये रोव्हमन पॉवेलची कामगिरी

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळणाऱ्या रोव्हमन पॉवेलने राजस्थान रॉयल्सविरुद्धही चांगली फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 15 चेंडूत 36 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना त्याने 16 चेंडूत 33 धावा केल्या. त्याचवेळी त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 21 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 202 धावा केल्या आहेत. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे. याआधी त्याने पाच सामन्यांत केवळ 31 धावा केल्या होत्या ज्यात तो दोनदा शून्यावर बाद झाला होता.

First published:

Tags: Sunrisers hyderabad