मुंबई, 5 एप्रिल : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमधली (IPL 2022) सुरूवात निराशाजनक झाली आहे. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा यंदा दिल्ली आणि राजस्थानविरुद्ध पराभव झाला. आता मुंबईचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार आहे. केकेआरने या मोसमात आतापर्यंत 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत.
मुंबई इंडियन्स यावेळी खराब फॉर्ममध्ये असतानाच टीमच्या खेळाडूने रोहित शर्मावर गंभीर आरोप केले आहेत. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या गौरव कपूरच्या शोमध्ये इशान किशन (Ishan Kishan) रोहित शर्माबद्दल बोलला आहे. 'रोहित शर्मा मॅचवेळी मैदानात शिव्या देतो, पण मॅच संपल्यानंतर या गोष्टी मनावर घेऊ नकोस, असं सांगतो,' असं इशान किशन म्हणाला. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मला एक-दोन रन काढायला सांगितले, पण रोहित माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुला पाहिजे ते कर. तो खेळाडूंना पूर्ण सूट देतो, अशी प्रतिक्रिया इशान किशनने दिली.
'अनेकवेळा बॉल जुना झाल्यानंतर बॉलिंग टीमला फायदा होतो, त्यामुळे मी बॉल मैदानावर आपटण्यासाठी थ्रो केला. बॉल गवतावर रगडून मी रोहितकडे दिला, पण त्यावेळी मैदानात बरचं दव पडलं होतं. रोहितने खिशातून रुमाल काढला आणि बॉल पुसताना मला शिव्या दिल्या. मला माझ्या चुकीची जाणीव झाली,' असं वक्तव्य इशानने केलं.
रोहित बरेच वेळा बॅटरला भ्रमित करण्यासाठी फिल्डिंगमध्ये खाली जागा सोडतो, ज्यामुळे बॅटर मोठा शॉट मारायला जातो आणि टीमला विकेट मिळते, असं इशान म्हणाला.
loved the BwC Ishan Kishan episode. uploading the part where he talks about captain Rohit. pic.twitter.com/KRiitxuGhc
विराटसोबत तशी बॉण्डिंग नाही
इशान किशनने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबतही (Virat Kohli) प्रतिक्रिया दिली आहे. 'मी रोहित शर्मासोबत बराच काळ खेळत आहे, त्यामुळे त्याच्यासोबत मस्करीही करतो, पण विराटसोबत असं काही करत नाही, कारण त्याच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. विराटसोबत तशाप्रकारची बॉण्डिंग झाली नाही,' असं इशानने सांगितलं.
आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात इशान किशनने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चला पहिल्याच बॉलला सिक्स मारली होती. विराटनेच आपल्याला असं करायला सांगितल्याचं इशान म्हणाला. आयपीएलच्या या मोसमात इशान किशनने धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकं केली आहेत, तसंच त्याच्याकडे सध्या सर्वाधिक रन केल्याबद्दल ऑरेंज कॅपही आहे. मुंबईने इशान किशनला लिलावात 15.25 कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.