Home /News /sport /

IPL 2022 साठी हिटमॅन तयार, प्रॅक्टिसमध्ये दिसला रोहितचा KGF अवतार!

IPL 2022 साठी हिटमॅन तयार, प्रॅक्टिसमध्ये दिसला रोहितचा KGF अवतार!

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) तयारीला सगळ्या टीमनी सुरूवातकेली आहे. पाचवेळा चॅम्पियन झालेली मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) सरावासाठी मैदानात उतरली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सरावाला सुरूवात केली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 19 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) तयारीला सगळ्या टीमनी सुरूवातकेली आहे. पाचवेळा चॅम्पियन झालेली मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) सरावासाठी मैदानात उतरली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सरावाला सुरूवात केली आहे. रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सराव सत्राच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेयर केले आहेत, यामध्ये तो बॅटिंग करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या निळ्या रंगात पुनरागमन, पहिला दिवस, असं कॅप्शन रोहितने या फोटोंना दिलं आहे. रोहित शर्माच्या सरावाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनीही पोस्ट केला आहे. मुंबई इंडियन्सनी या व्हिडिओमध्ये दाक्षिणात्य लोकप्रिय चित्रपट केजीएफचं गाणंही टाकलं आहे. हे रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  रोहित शर्मासाठी यंदाची आयपीएल स्पेशल आहे, कारण टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन झाल्यानंतर रोहितची ही पहिलीच आयपीएल आहे. आता रोहित शर्मा टीम इंडियाचा टेस्ट, वनडे आणि टी-20 फॉरमॅटचा कर्णधार आहे. रोहित शर्मा आयपीएल इतिहासातला सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. रोहितनंतर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला चारवेळा आयपीएल जिंकता आली.
  श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्ये यायच्या आधी क्वारंटाईन झाला होता. क्वारंटाईन असताना त्याने पत्नी रितीका सजदेह आणि मुलगी समायरासोबत फोटो शेयर केला होता.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma

  पुढील बातम्या