मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सना धक्का? रोहितही विराटप्रमाणेच सोडणार कॅप्टन्सी!

IPL 2022 : मुंबई इंडियन्सना धक्का? रोहितही विराटप्रमाणेच सोडणार कॅप्टन्सी!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. टीमने सुरूवातीच्या चारही मॅच गमावल्या आहेत, त्यामुळे ते शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बॅटमधूनही रन येत नाहीयेत, ज्याचा फटका टीमला बसत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. टीमने सुरूवातीच्या चारही मॅच गमावल्या आहेत, त्यामुळे ते शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या या मोसमात मुंबई वगळता प्रत्येक टीमला किमान एक तरी विजय मिळाला आहे. या लाजिरवाण्या कामगिरीमुळे मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणंही कठीण झालं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बॅटमधूनही रन येत नाहीयेत, ज्याचा फटका टीमला बसत आहे. रोहितने 4 मॅचमध्ये 20 च्या सरासरीने 80 रन केले आहेत, तसंच त्याला अजून एक अर्धशतकही करता आलेलं नाही. काही वेळानंतर मुंबईचा पाचवा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (MI vs PBKS) आहे. पंजाबने 4 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत.

क्रिकइन्फोसोबत बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीबाबत वक्तव्य केलं आहे. रोहितही विराटप्रमाणे कॅप्टन्सी सोडून थोडा रिलॅक्स होईल आणि फक्त बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करेल. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कॅप्टन्सी करत आहे, त्यामुळे त्याला ही जबाबदारी देता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली. 2013 साली मुंबईने रोहितला टीमचा कर्णधार केलं होतं. पहिल्याच मोसमात त्याने मुंबईला चॅम्पियन केलं होतं.

'लिलावानंतरच मुंबईच्या टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मुंबईची टीम प्ले-ऑफला पोहोचणार नाही, असं मला वाटतं, याची भविष्यवाणी मी आधीच केली होती. रोहित जेव्हा टीम इंडियाकडून खेळतो तेव्हा त्याची बॅटिंग आणखी चांगली होते. पण आयपीएलमध्ये तो दबावात येतो. मागच्या 3-4 मोसमांपासून हेच दिसत आहे. सूर्यकुमार यादव टीमचा महत्त्वाचा भाग आहे,' असं मांजरेकर म्हणाले. सूर्याने या मोसमात 2 मॅच खेळल्या, यातल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक केलं.

बुमराहशिवाय कोणी नाही

मुंबई इंडियन्सची बॉलिंग कमजोर दिसत आहे. जसप्रीत बुमराहशिवाय कोणत्याही बॉलरला मैदानात उतरवा, काहीच फरक दिसत नाही. टीमने मिल्स, सॅम्स, उनाडकट आणि थम्पी यांना संधी दिली, पण त्यांची क्षमता कमी आहे. मुंबईला पुढे जायचं असेल तर बॅटिंगलाच काही तरी करावं लागेल, असं मांजरेकर म्हणाले.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma