मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : '...तर Playing XI मध्ये जागा मिळणार नाही', चहलनंतर उथप्पाचे मुंबईच्या सदस्यावर खळबळनजक आरोप

IPL 2022 : '...तर Playing XI मध्ये जागा मिळणार नाही', चहलनंतर उथप्पाचे मुंबईच्या सदस्यावर खळबळनजक आरोप

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेली आयपीएल (IPL 2022) सुरू आहे. रोमांचक क्रिकेट सामन्यांसोबतच आयपीएल बरेच वेळा वादामुळेही चर्चेत असते. युझवेंद्र चहलनंतर (Yuzvendra Chahal) आता रॉबिन उथप्पानेही (Robin Uthappa) मुंबई इंडियन्समधल्या (Mumbai Indians) सदस्यावर आरोप केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 एप्रिल : जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेली आयपीएल (IPL 2022) सुरू आहे. रोमांचक क्रिकेट सामन्यांसोबतच आयपीएल बरेच वेळा वादामुळेही चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 2013 सालच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंनी मद्यधुंद अवस्थेमध्ये आपल्याला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये लटकवल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर आता रॉबिन उथप्पानेही (Robin Uthappa) आता मुंबई इंडियन्सच्या टीममधल्या एका सदस्यावर आरोप केला आहे. आयपीएल 2008 नंतर आपल्यावर टीम बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं उथप्पा म्हणाला आहे.

आयपीएल 2022 मध्ये रॉबिन उथप्पा सीएसकेकडून खेळत आहे. स्पर्धेच्या 15 मोसमांमध्ये उथप्पा 6 टीमकडून खेळला. मुंबईने 2008 साली उथप्पाला विकत घेतलं होतं. यानंतर लगेचच पुढच्या मोसमात त्याला आरसीबीमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. यावेळी घडलेली घटना उथप्पाने आर. अश्विनच्या युट्युब शो मध्ये सांगितली. 2009 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समधल्या एकाने मला जबरदस्तीने आरसीबीसोबत करार करायला भाग पाडल्याचा आरोप उथप्पाने केला.

'मी, झहीर खान आणि मनिष पांडे, यांच्यापैकी ट्रान्सफर होणारा मी पहिला खेळाडू होतो. माझ्यासाठी ही गोष्ट कठीण होती, कारण माझी निष्ठा मुंबई इंडियन्स टीमशी होती. आयपीएल सुरू व्हायच्या एक महिना आधी ट्रान्सफर करारावर सही करायला मी नकार दिला होता. मी ट्रान्सफर करारावर सही केली नाही, तर मुंबई इंडियन्सच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये तुला संधी मिळणार नाही, असं मुंबई इंडियन्समधल्याच एकाने मला सांगितलं, मी त्याचं नाव सांगणार नाही,' असं उथप्पा म्हणाला.

'त्यावेळी मी वैयक्तिक आयुष्यातही खराब काळातून जात होतो. मी डिप्रेशनमध्येही होतो. आरसीबीकडून खेळताना मला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. मला टीममधून बाहेर करण्यात आलं, त्यानंतर जेव्हा संधी मिळाली त्या एकाच मॅचमध्ये मी चांगला खेळलो,' अशी प्रतिक्रिया उथप्पाने दिली.

रॉबिन उथप्पा आयपीएल 2008 मध्ये मुंबई इंडियन्सकडून सगळ्या 14 मॅच खेळला, यात त्याने 320 रन केले, पण आरसीबीकडून खेळताना 2009 मध्ये त्याला 13 सामन्यांमध्ये फक्त 175 रन करता आले. आयपीएल 2014 मध्ये उथप्पाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. केकेआरकडून खेळताना त्याने 660 रन ठोकले. त्या मोसमात सर्वाधिक रन केल्यामुळे त्याला ऑरेंज कॅपही देण्यात आली. उथप्पाने केकेआरकडून 6 मोसमांमध्ये 30.5 च्या सरासरीने 16 अर्धशतकांच्या मदतीने 1790 रन केल्या.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians