Home /News /sport /

IPL 2022 : थंड घ्या! Riyan Parag बद्दलच्या त्या ट्वीटने वाद, Suryakumar Yadav ला द्यावं लागलं स्पष्टीकरण

IPL 2022 : थंड घ्या! Riyan Parag बद्दलच्या त्या ट्वीटने वाद, Suryakumar Yadav ला द्यावं लागलं स्पष्टीकरण

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals vs Gujarat Titans) खेळाडू रियान पराग (Riyan Parag) वादात सापडला. या वादामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar Yadav) उडी घेतली.

    मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals vs Gujarat Titans) खेळाडू रियान पराग (Riyan Parag) वादात सापडला. मंगळवारी गुजरातविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात परागच्या मैदानातल्या वर्तणुकीवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. या वादामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar Yadav) उडी घेतली. मैदानामध्ये उत्कृष्ट ऍटिट्यूट, रियान पराग असं ट्वीट सूर्यकुमार यादवने केलं, यानंतर अनेकांनी सूर्यकुमार यादववरही निशाणा साधला. वाद वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर सूर्यकुमार यादवने यावर स्पष्टीकरण करणं. रियान परागच्या फिल्डिंगबद्दल मी बोलत होतो, थंड घ्या मित्रांनो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. गुजरातविरुद्धच्या मॅचवेळी लॉन्ग ऑनवर फिल्डिंग करताना परागने उडी मारून फोर वाचवली आणि बॉल बाजूलाच उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या दिशेने फेकला. बॉल पकडायला पडिक्कलने थोडा उशीर केला, तेव्हा पराग पडिक्कलवर संतापला. त्याआधी राजस्थानची बॅटिंग सुरू असताना पराग अश्विनवरही भडकला. परागने नसलेली दुसरी रन धावण्यासाठी गेला आणि रन आऊट झाला, यानंतर त्याने अश्विनला खुन्नस दिली आणि डग आऊटमध्ये संतापलेला चेहेरा घेऊन गेला. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात परागच्या वर्तणुकीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आधीही पराग वादात सापडला होता. कॅच पकडल्यानंतर परागने थर्ड अंपायरची खिल्ली उडवली, ज्यावरून कॉमेंटेटर आणि चाहत्यांनी परागवर निशाणा साधला. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात परागचे हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजसोबतही वाद झाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022

    पुढील बातम्या