नवी दिल्ली, 1डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी अनेक बड्या खेळाडूंना फ्रँचायझींनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता त्यांना खरेदी करण्यासाठी सर्व टीममध्ये जोरदार चुरस (Bidding War) रंगणार आहे. या यादीमध्ये श्रेयस अय्यरदेखील आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं रिषभ पंतला 16 कोटींत संघात कायम राखले. त्यापाठोपाठ अक्षर पटेल ( 9 कोटी), पृथ्वी शॉ (8 कोटी) व अॅनरिच नॉर्ट्जे ( 6 कोटी) या खेळाडूंना दिल्लीनं संघात कायम राखले. दिल्लीच्या खात्यात आता 47.5 कोटी आहेत आणि त्यात त्यांना आयपीएल 2022साठी तगडे खेळाडू खरेदी करायचे आहेत.
श्रेयसनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्याच्या दिल्ली कॅपिटल्ससोबतचा प्रवास सांगितला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी 8 फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. पंजाब किंग्सनं फक्त दोनच खेळाडूंना कायम राखले, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी प्रत्येकी तीन आणि चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखले आहे.
एकूण 27 खेळाडूंना कायम राखले गेले. लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा आदी स्टार खेळाडूंना रिलिज केले गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction