मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : गंभीरने पुन्हा धोनीला डिवचलं, खेळाडूंना रिटेन करण्यावरून साधला निशाणा

IPL 2022 : गंभीरने पुन्हा धोनीला डिवचलं, खेळाडूंना रिटेन करण्यावरून साधला निशाणा

आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) च्या मोसमाआधी प्रत्येक टीमला त्यांचे रिटेन केलेले खेळाडू घोषित करायचे आहेत. त्याआधी गौतम गंभीरने (Gautam Gambhir) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) च्या मोसमाआधी प्रत्येक टीमला त्यांचे रिटेन केलेले खेळाडू घोषित करायचे आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत प्रत्येक टीमला ही यादी बीसीसीआयकडे (BCCI) द्यायची होती, यानंतर बीसीसीआय प्रत्येक टीमने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करेल. 4 खेळाडूंना रिटेन केलं तर टीमचे 42 कोटी रुपये खर्च होतील, तर 3 खेळाडू रिटेन केले तर 33 कोटी, 2 खेळाडू रिटेन केले तर 24 कोटी आणि एक खेळाडू रिटेन केले तर 14 कोटी रुपये खर्च होतील.

क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या टीमने कोणते खेळाडू रिटेन केले याची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे गौतम गंभीरने (Gautam Gambhir) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरने चेन्नईच्या चार खेळाडूंची निवड केली, यात त्याने धोनीच्या नावाचा समावेश केला नाही. गौतम गंभीरच्या मते चेन्नईने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) आणि सॅम करन (Sam Curran) यांना रिटेन केलं पाहिजे.

गौतम गंभीरने त्याच्या रिटेन खेळाडूंमध्ये धोनीचं नाव घेतलं नसलं, तरी चेन्नई सुपर किंग्स धोनीला टीममध्ये ठेवणार हे निश्चित आहे. काहीच दिवसांपूर्वी एमएस धोनीने याचे संकेत दिले होते. धोनी चेन्नईकडून सर्वाधिक रक्कम घेणारा खेळाडू आहे. धोनी रिटेन केलेला पहिला खेळाडू असेल, त्यामुळे त्याला 16 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा यांचंही रिटेन होणं निश्चित मानलं जात आहे. सॅम करन, फाफ डुप्लेसिस आणि मोईन अली या तिघांमध्ये एका स्थानासाठी चुरस आहे. एक टीम जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडूंना रिटेन करू शकते. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईने धोनी, जडेजा, गायकवाड आणि मोईन अली यांना रिटेन केलं आहे. ऋतुराजने आयपीएल 2021 मध्ये 635 रन करून ऑरेंज कॅप पटकावली. तर मोईन अलीनेही चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली.

First published: