मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीची असाही मोठेपणा, जडेजाला करून दिला 4 कोटींचा फायदा!

IPL 2022 : धोनीची असाही मोठेपणा, जडेजाला करून दिला 4 कोटींचा फायदा!

चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनीच, त्यामुळे धोनीचा शब्द मैदानावर आणि मैदानाबाहेर कधीच टाळला जात नाही. आज  IPL 2022 साठी Retention सुरू आहे.

चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनीच, त्यामुळे धोनीचा शब्द मैदानावर आणि मैदानाबाहेर कधीच टाळला जात नाही. आज IPL 2022 साठी Retention सुरू आहे.

चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनीच, त्यामुळे धोनीचा शब्द मैदानावर आणि मैदानाबाहेर कधीच टाळला जात नाही. आज IPL 2022 साठी Retention सुरू आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 नोव्हेंबर :  चेन्नई सुपर किंग्सचा (chennai super kings) कॅप्टन महेंद्र सिंग धोनी (mahendra singh dhoni) आपल्या कुशल नेतृत्वामुळे नेहमी टीमला विजयाचे शिखर सर करत असतो. धोनीचा मोठेपणा ड्रेसिंग रुमपासून ते मैदानावर सहज पाहण्यास मिळतो. आताही आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) च्या रिटेन निवडीमध्येही त्याने आपल्या मोठेपणा दाखवला. धोनीने स्वत:ला कमी रक्कम लावली आणि रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) त्याच्यापेक्षा जास्त रक्कमेत टीममध्ये परत स्थान दिले.

चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच धोनी, त्यामुळे धोनीचा शब्द मैदानावर आणि मैदानाबाहेर कधीच टाळला जात नाही. आज  IPL 2022 साठी Retention सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला तब्बल 16 कोटींची बोली लावली. तर महेंद्र सिंह धोनीला 12 कोटी आणि मोईन अलीला 8 कोटी रुपये लावून रिटेन करण्यात आले आहे. मागील आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला सुद्धा 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आले आहे.

IPL 2022 : Punjab Kings मधून सगळे स्टार बाहेर, प्रितीच्या टीमचा दोघांवर विश्वास!

विशेष म्हणजे,  चेन्नई सुपर किंग्सने सुरुवातीलाच रवींद्र जडेजाला 16 कोटी रक्कम देऊन रिटेन केलं. त्यामुळे धोनीची रक्कम ही 4कोटीने कमी झाली आहे आणि जडेजा 4कोटी जास्त कमावणार आहे. चेन्नईकडे मेगा निलामीसाठी अजून 48 कोटी शिल्लक आहे. त्यामुळे अजून कुणा कुणाची लॉटरी लागते हे पाहण्याचे ठरणार आहे.

IPL 2022 : Mumbai Indians चा शेवटच्या क्षणी धक्का, हे 4 खेळाडू मुंबईचे 'किंग'

तर दुसरीकडे  ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसी सारख्या अनुभवी खेळाडूंना सोडावे लागले आहे. तर मिस्टर आयपीएल म्हणून ओळख मिळवलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) चेन्नईसाठी ऐतिहासिक खेळी केल्या. रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 5,528 रन केले. फक्त एक फायनल सोडली तर रैना सीएसकेने खेळलेल्या सगळ्या फायनलमध्ये खेळला, यावेळी मात्र चेन्नईने रैनाला रिटेन केलं नाही.

फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) एकट्याच्या जीवावर चेन्नईला आयपीएल 2021 ची फायनल जिंकवून दिली होती. फायनलमध्ये डुप्लेसिसने 86 रनची खेळी केली. आयपीएलमध्ये त्याने एकूण 100 मॅच खेळून 2,935 रन केले आहेत. असं असलं तरी चेन्नईने फाफ डुप्लेसिसला रिटेन केलं नाही.

First published: