Home /News /sport /

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या टीमनी प्ले-ऑफमधलं (IPL Play Off) त्यांचं स्थान निश्चित केलं आहे.

    मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या टीमनी प्ले-ऑफमधलं (IPL Play Off) त्यांचं स्थान निश्चित केलं आहे. मुख्य म्हणजे या दोन्ही टीमसाठी यंदाची आयपीएल ही पहिलीच आहे. लीग स्टेजचा शेवटचा आठवडा सुरू असल्यामुळे आता प्ले-ऑफचं चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागलं आहे. बुधवारी लखनऊ सुपर जाएंट्सने केकेआरचा (KKR) पराभव केला, त्यामुळे केकेआर प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्ले-ऑफमधून आधीच बाहेर झाल्या. यानंतर गुरूवारी आरसीबीने (RCB) गुजरातचा पराभव केल्यामुळे पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांचंही प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. आरसीबीच्या खात्यात आता 14 मॅचमध्ये 8 विजयांसह 16 पॉईंट्स झाले आहेत. पंजाब (Punjab Kings) आणि हैदराबाद (SRH) या दोन्ही टीमच्या खात्यात 12 पॉईंट्स आहेत आणि त्यांची एक मॅच शिल्लक आहे, पण तरीही या दोन्हीपैकी एकही टीम 16 पॉईंट्सपर्यंत पोहोचणार नसल्यामुळे त्यांना आता प्ले-ऑफ गाठता येणार नाही. प्ले-ऑफच्या उरलेल्या दोन जागांसाठी आता राजस्थान (Rajasthan Royals), दिल्ली (Delhi Capitals) आणि आरसीबी या तीन टीममध्ये रेस आहे. राजस्थान आणि आरसीबीच्या खात्यात 16 पॉईंट्स आहेत तर दिल्लीकडे 14 पॉईंट्स आहेत, पण राजस्थानचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित आहे, कारण त्यांचा नेट रन रेट या दोन्ही टीमपेक्षा चांगला आहे. राजस्थान त्यांचा अखेरचा सामना सीएसकेसोबत खेळणार आहे, या सामन्यात त्यांचा पराभव झाला तरी त्यांचा नेट रन रेट आरसीबी आणि दिल्लीपेक्षा खराब होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. राजस्थानचा नेट रनरेट +0.304, आरसीबीचा -0.253 आणि दिल्लीचा +0.255 एवढा आहे. आरसीबीचं भविष्य मुंबईच्या हाती आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यात शनिवारी महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचेल, पण जर मुंबईने हा सामना गमावला तर मात्र आरसीबीच्या प्ले-ऑफला पोहचण्याच्या स्वप्नांचा चुराडा होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या