Home /News /sport /

IPL Play Offs : RCB च्या विजयाने एका नाही तर दोन टीमचं स्वप्न तुटणार, असं बदलणार गणित!

IPL Play Offs : RCB च्या विजयाने एका नाही तर दोन टीमचं स्वप्न तुटणार, असं बदलणार गणित!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शुक्रवारी आरसीबी आणि पंजाब किंग्स (RCB vs Punjab Kings) यांच्यात महत्त्वाची लढत होणार आहे. दोन्ही टीमसाठी प्ले-ऑफच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

    मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शुक्रवारी आरसीबी आणि पंजाब किंग्स (RCB vs Punjab Kings) यांच्यात महत्त्वाची लढत होणार आहे. दोन्ही टीमसाठी प्ले-ऑफच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पंजाबसाठी मात्र ही करो या मरो ची लढाई आहे, तर आरसीबीसाठी प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) प्रवेश करण्याची सोपी संधी आहे. या सामन्यात आरसीबीचा विजय झाला तर ते प्ले-ऑफमध्ये तर पोहोचतीलच पण सोबतच दोन टीमचं स्वप्नही तुटेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत 59 मॅच झाल्या आहेत आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) वगळता एकही टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आधीच या रेसमधून बाहेर झाले आहेत. बाकीच्या 7 टीम अजूनही 3 जागांसाठी लढत आहेत. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 18 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. लखनऊ सुपरजायंट्स (16) दुसऱ्या, राजस्थान रॉयल्स (14) तिसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (14) चौथ्या नंबरवर आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्स (12), सनराइजर्स हैदराबाद (10) आणि कोलकाता नाइटराइडर्स (10) आहेत. पंजाब किंग्स (10) आठव्या नंबरवर आहे. चेन्नई सुपर किंग्स (8) आणि मुंबई इंडियन्स (6) शेवटच्या 2 क्रमांकांवर आहेत. आरसीबीने आज पंजाबविरुद्ध विजय मिळवला तर त्यांच्या खात्यात 16 पॉईंट्स होतील. सध्या फक्त गुजरात आणि लखनऊ यांचेच 16 किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंट्स आहेत. आरसीबीचा आज विजय झाला तर पंजाबचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगेल. आरसीबीचा विजय पंजाबसोबतच केकेआरचं जहाजही बुडवू शकतं. केकेआरच्या खात्यात 12 मॅचमध्ये 10 पॉईंट्स आहेत. केकेआरने उरलेल्या 4 मॅच जिंकल्या तरी त्यांच्या खात्यात जास्तीत जास्त 14 पॉईंट्स होतील. चौथ्या टीममध्ये राजस्थान रॉयल्ससाठी गणित सोपं आहे. राजस्थानच्या खात्यात 12 मॅचमध्ये 14 पॉईंट्स आहेत, एक विजय त्यांना 16 पॉईंट्सवर नेईल. या परिस्थितीमध्ये प्ले-ऑफमध्ये खेळणाऱ्या चारही टीमचे कमीत कमी 16 पॉईंट्स होतील. दिल्लीलाही 16 पॉईंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. तर हैदराबादला 16 पॉईंट्सपर्यंत जाण्यासाठी तिन्ही मॅचमध्ये विजय गरजेचा आहे. गुजरात, लखनऊ, बँगलोरशिवाय राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद 16 पॉईंट्सच्या रेसमध्ये आहेत, त्यामुळे प्ले-ऑफचं समिकरण आणखी रोमांचक झालं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Punjab kings, RCB

    पुढील बातम्या