IPL 2022 : पाच वेळा नशिबानेही दिली संधी, पण विराटने पुन्हा केली तीच चूक, VIDEO
IPL 2022 : पाच वेळा नशिबानेही दिली संधी, पण विराटने पुन्हा केली तीच चूक, VIDEO
virat kohli
आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लागोपाठ 2 वेळा गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात विराट कोहलीपुढे (Virat Kohli) तिसऱ्यांदा पहिल्या बॉलवर आऊट न होण्याचं आव्हान होतं.
पुणे, 26 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लागोपाठ 2 वेळा गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात विराट कोहलीपुढे (Virat Kohli) तिसऱ्यांदा पहिल्या बॉलवर आऊट न होण्याचं आव्हान होतं. हे आव्हान विराटने यशस्वीरित्या पार पाडलं, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात पुन्हा अपयश आलं. खरंतर या सामन्यात विराटला नशिबानेही पाच वेळा साथ दिली, पण या संधींचं त्याला सोनं करता आलं नाही.
ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) टाकलेल्या पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर बोल्टने लेग साईडला बॉल टाकला. यावेळी बोल्टने स्क्वेअर लेग अंपायरच्या जवळ फिल्डरही उभा केला होता. बोल्टने विराटसाठी लावलेला हा सापळा जवळपास यशस्वीच झाला होता, पण कॅच फिल्डरपासून फक्त काही इंच लांब राहिला. यानंतर पाचव्या आणि सहाव्या बॉलला विराटच्या इनसाईड एज लागल्या, यातली एक फोर गेली.
बोल्टच्या पहिल्या ओव्हरमध्ये तीनवेळा वाचल्यानंतर विराटला दुसऱ्याच ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगवरही दोन वेळा जीवनदान मिळालं. कृष्णाच्या पहिल्याच बॉलवर विराटने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा इनसाईड एज लागून बॉल त्याच्या पॅडवर लागला. ओव्हरचा चौथा बॉल कृष्णाने ऑफ स्टम्पबाहेर बाऊन्सर टाकला, ज्यावर विराट पूल मारायला गेला, पण त्याच्या बॅटच्या जवळून बॉल गेला. अंपायरने हा वाईड बॉल दिला, यानंतरच्याच बॉलला कृष्णाने विराटची विकेट घेतली. 10 बॉलमध्ये 9 रन करून विराट आऊट झाला.
आयपीएलच्या या मोसमात विराटची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे आरसीबीने या मॅचमध्ये त्याला ओपनिंगला पाठवलं, पण इकडेही त्याला संघर्षच करावा लागला. आयपीएल 2022 मध्ये विराटने 9 मॅचमध्ये फक्त 128 रन केल्या आहेत. 41 नाबाद आणि 48 रनची खेळी सोडली तर विराटच्या नावावर 12, 5, 1,12,0,0 आणि 9 रन आहेत.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.