Home /News /sport /

IPL 2022 : धोनीचा बुलेट Run Out, कोहलीच्या चुकीची शिक्षा मॅक्सवेलला, Video

IPL 2022 : धोनीचा बुलेट Run Out, कोहलीच्या चुकीची शिक्षा मॅक्सवेलला, Video

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सीएसकेविरुद्धच्या (CSK vs RCB) सामन्यात विराटने (Virat Kohli) केलेल्या चुकीची शिक्षा ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) भोगावी लागली आहे. विकेट मागे उभ्या असलेल्या एमएस धोनीने (MS Dhoni) क्षणाचाही विलंब न घालवता मॅक्सवेलला रन आऊट केलं.

पुढे वाचा ...
    पुणे, 4 मे : विराट कोहली (Virat Kohli) जगातील सर्वात फिट असलेल्या खेळाडूपैकी एक आहे. फक्त फिल्डिंगच नाही तर रन काढतानाही विराटएवढा जलद धावणारा खेळाडू सापडणं कठीणच आहे, पण आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सीएसकेविरुद्धच्या (CSK vs RCB) सामन्यात विराटने केलेल्या चुकीची शिक्षा ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) भोगावी लागली आहे. विकेट मागे उभ्या असलेल्या एमएस धोनीने (MS Dhoni) क्षणाचाही विलंब न घालवता मॅक्सवेलला रन आऊट केलं. विराट कोहलीने मॅक्सवेलला एक रन काढण्यासाठी बोलावलं, त्यामुळे मॅक्सवेलही रनसाठी धावला पण या गडबडीमध्ये मॅक्सवेल रन आऊट झाला. नवव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. कोहली ऑफ साईडला बॉल मारल्यानंतर धावायला लागला, यानंतर रॉबिन उथप्पाने बॉल थ्रो करून धोनीकडे फेकला आणि धोनीने उरलेलं काम करून टाकलं. मॅक्सवेल जेव्हा आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये जात होता तेव्हा विराटच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही सांगून जात होते. मॅक्सवेलची विकेट घेतल्याचा पश्चाताप विराटच्या चेहऱ्यावर दिसत होता. मॅक्सवेल 3 बॉलमध्ये 3 रन करून आऊट झाला. विराट कोहली 33 बॉलमध्ये 30 रन करून आऊट झाला, मोईन अलीने त्याला बोल्ड केलं. या सामन्यातत सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Glenn maxwell, Ipl 2022, MS Dhoni, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या